तपोवनात ना. छगन भुजबळ यांना दाखवले काळे झेंडे

6तपोवनात ना. छगन भुजबळ यांना दाखवले काळे झेंडे
मराठा आरक्षणावरून झेंडे दाखवल्याची चर्चा
नाशिक : प्रतिनिधी
जनार्दन स्वामींचे उत्तराधिकराऱ्यांच्या निष्काम कर्मयोगी सोहळा हा नाशिक शहरातील तपोवन येथे सुरू असून या कार्यक्रमासाठी राज्यभरातून भाविक आलेले आहेत. जय बाबाजी भक्त परिवाराकडून जय श्रीराम निष्काम कर्मयोगी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे कार्यक्रमासाठी गेले असता त्यांना तेथे जमलेल्या लोकांनी ना. भुजबळ यांना काळे झेडे दाखवत निषेध केला.
नाशिक येथील निष्काम कर्मयोगी सोहळ्यात छगन भुजबळ यांनी हजेरी लावली यावेळी या ठिकाणी जमलेल्या काही भक्तांकडून छगन भुजबळ यांचा निषेध करण्यात आला छगन भुजबळ निष्काम कर्मयोगी सोहळ्यासाठी आले असता त्यांना तेथील काही भक्तांकडून काळे झेंडे दाखवण्यात आले.
जरांगे पाटील यांच्या नंतर छगन भुजबळ यांनी देखील ओबीसी बच्छाव एल्गार सभा घेण्यास सुरुवात केली असून ओबीसी विरुद्ध मराठा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे छगन भुजबळ यांच्या विरोधात मराठा समाजाचे अनेक लोक आक्रमक झाले असून आज पुन्हा एकदा नाशिक मध्ये छगन भुजबळ यांना या रोषाला सामोरे जावे लागले आहे. नाशिक मध्ये सुरू असलेल्या एका धार्मिक कार्यक्रमात छगन भुजबळ यांना काळे झेंडे दाखवत निषेध करण्यात आला. यासाठी छगन भुजबळ यांनी हजेरी लावली होती यावेळी तिथे जमलेल्या काही भक्तांकडून काळ्या रंगाचे कपडे दाखवत छगन भुजबळ यांचा निषेध करण्यात आला  मागच्या गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे पाटील असा सामना  पहावयास मिळत आहे . मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये स्वतंत्र आरक्षण द्यावे अशी भूमिका छगन भुजबळ यांची असून त्यांच्या या भूमिकेला मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजाकडून विरोध केला जात आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या विरोधात मराठा समाज राज्यभरात  आक्रमक झाला आहे.
पाहा व्हीडिओ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *