मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी भुजबळांना दिली महापुरुषांची पुस्तके भेट

मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी भुजबळांना दिली महापुरुषांची पुस्तके भेट

लासलगाव:समीर पठाण

लासलगाव येथील मराठा समाजाच्या तीन प्रमुख कार्यकर्त्यांनी ना छगन भुजबळ यांना महात्मा जोतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके पाठवली असून भुजबळ यांनी या पुस्तकांचे वाचन करत या महापुरुषांचे विचाराचे अनुकरण करण्याची मागणी केली आहे

मराठा कुणबी ओबीसी वादामुळे ओबीसी नेते,राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आणि मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांच्यात सुरू असलेल्या वार,पलटवारामुळे राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघालेला असताना आता भुजबळांचा मतदारसंघ असलेल्या येवला-लासलगाव मतदार संघातील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी छगन भुजबळांना डिवचले आहे.

महात्मा जोतिबा फुले,राजर्षी शाहू आणि डॉ बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारापासून मंत्री छगन भुजबळांना यांच्या विचारांचा विसर पडल्याने भुजबळ आज खालच्या पातळीवर जाऊन मराठा समाजावर टीका करत आहे त्यामुळे आम्ही त्यांना ही पुस्तके भारतीय पोस्ट डाक विभागामार्फत पाठवली असून या पुस्तकांचे भुजबळांनी वाचन करत महात्मा फुले,राजर्षी शाहू आणि डॉ आंबेडकर यांच्या विचारांचे अनुकरण करावे अशी मागणी केली असून भुजबळांनी पुस्तके वाचले किंवा नाही वाचली हे त्यांच्या भाषणातून कळेल आम्हाला कुरियरची पोच पावती नको असे यावेळी डॉ.सुजित गुंजाळ,प्रविण कदम,प्रमोद पाटील यांनी सांगून हे अनोखे आंदोलन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *