छगन भुजबळांच्या उमेदवारी विरोधात पळसेत बँनर

छगन भुजबळांच्या उमेदवारी विरोधात पळसेत बँनर

नाशिकरोड : प्रतिनिधी
नाशिकचे माजी पालकमंत्री नामदार छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून भाजप तसेच अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी मिळू नये, या मागणीसाठी नाशिक तालुक्यातील पळसे गावांमध्ये सकल मराठा समाजाने ठीक ठिकाणी फलक उभारण्यास सुरुवात केली होती मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून उभारलेले फलक स्वतः काढले आहे. त्यामुळे काहीवेळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी फलक काढले असले तरी नाशिक तालुक्यातील प्रत्येक गावात अश्या स्वरूपाचे फलक उभारले जाणार असल्याचा इशारा सकल मराठा समाजातर्फे दिला जातो आहे. तर सदर घटनास्थळी साहय.पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी याच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी भेट देऊन पाहणी करत संबधितावरती गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले.

मराठा समाजाला ओबीसी समाजामधून आरक्षण मिळू नये, तसेच त्याविरोधात महाराष्ट्रात ठीक ठिकाणी सभा घेऊन छगन भुजबळ यांनी विरोध केला होता. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात देखील भुजबळ यांनी वैयक्तिक पातळीवर जात एकेरी टीका केली होती. भुजबळ हे सतत मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेत आले आहे . त्यामुळे महाराष्ट्रात भुजबळ विरुद्ध सकल मराठा समाज असे चित्र निर्माण झाले असताना भुजबळ यांना अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात केली जात आहे. नाशिक लोकसभा मतदार संघात भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू होताच येथील सकल मराठा समाजाने भुजबळांना उमेदवारी मिळू नये, यासाठी गाव पातळीवर फलक उभारून भुजबळांच्या उमेदवारीला विरोध करत भाजप व राष्ट्रवादी समोर दबाव तंत्राचा वापर सुरू करण्यास सुरुवात केली आहे. सध्या नाशिक तालुक्यातील एक ते दोन गावांमध्ये अशा प्रकारचे फलक दिसून येत असून यापुढे प्रत्येक गावात आम्ही फलक उभारू, असा इशारा येथील सकल मराठा समाजा तर्फे दिला जातो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *