रामनवमीनिमित्त मंत्री छगन भुजबळ यांनी
काळाराम मंदिरात घेतले प्रभू रामाचे दर्शन
नाशिक : प्रतिनिधी
रामनवमीच्या निमित्ताने नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिरामध्ये आयोजित रामजन्मोत्सव सोहळ्यास राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली. यावेळी प्रभू श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेत उपस्थित भाविकांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ, डॉ.शेफाली भुजबळ, महंत सुधीरदास महाराज, भाजपचे नेते नितीन वानखेडे, विश्वस्त मंदार जानोरकर, मंगेश जानोरकर, समाधान जेजुरकर, चिन्मय गाढे यांच्यासह पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.