उत्तर महाराष्ट्र

मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र

मंत्री छगन भुजबळ यांना
जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र
नाशिक : प्रतिनिधी
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने गोळीबाराच्या घटना घडत असतानाच
अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकीचे पत्र आल्याने खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीकडून भुजबळ यांना हे पत्र पाठविले असून, त्यात पाच जणांनी भुजबळ यांना मारण्याची सुपारी घेतल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.  भुजबळ फार्म येथील कार्यालयात हे पत्र आले आहे. दरम्यान, हे पत्र आल्यानंतर पोलीस यंत्रणा सक्रिय झाली असून, त्यांनी सुरक्षेत वाढ केली आहे. या पत्रात मुजबळ यांच्या जिवाला धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच भुजबळ यांना जीवे मारण्याची सुपारी पाच जणांनी घेतली असून, हे पाचही जण भुजबळांच्या शोधात आहेत. ते केव्हाही त्यांना जीवे मारू शकतात. हे पाचही जण गंगापूर, दिंडोरी, चांदशी येथील हॉटेलमध्ये बसून असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. या पाचही जणांनी पन्नास लाख रुपयांची सुपारी घेतली आहे. या गुंडापासून भुजबळ साहेब तुम्ही सावध रहा,असा इशारा देण्यात आला आहे. एक मराठा लाख मराठा माफिया तुमचा गेम करणार असल्याचेही यामध्ये लिहिले आहे. या हल्लयासंदर्भातील एक मीटिंग हॉटेलमध्ये झाल्याचेही या पत्रात म्हटले आहे. हे पत्र तुमचाच हितचिंतक शिंदे देशमुख या नावाने पाठविले आहे. हे पत्र फेक आहे की खरे याचा पोलीस शोध घेत आहेत.

Bhagwat Udavant

Recent Posts

भाजपा नाशिक महानगर जिल्हा कार्यकारिणी जाहीर

नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार नाशिक : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या नाशिक महानगर जिल्ह्याची सन…

3 days ago

रेशन दुकानदारांच्या मार्जिनमध्ये 20 रुपये वाढ

मंत्रिमंडळाचा निर्णय; दुकानदारांमध्ये नाराजी नाशिक : प्रतिनिधी राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या…

3 days ago

नाशकात चारशे मतदान केंद्रे वाढणार

नगरविकासकडून निवडणूक आयोगाला प्रस्ताव सादर नाशिक : प्रतिनिधी शहरात होणार्‍या महापालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची संख्या…

3 days ago

जिल्ह्यात दहशत बिबट्याची, पर्वणी चोरांची

अफवांची गावभर चर्चा; ग्रामीण भागात नागरिकांचा जागता पहारा निफाड : तालुका प्रतिनिधी गेल्या काही दशकापासून…

3 days ago

सिन्नरला अतिक्रमणांवर हातोडा; रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

मुख्याधिकारी कदम यांची धाडसी कारवाई सिन्नर : प्रतिनिधी अतिक्रमणे काढण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने आठवडाभर अगोदर नोटिसा…

3 days ago

पाच कोटी द्या, दीड लाख मतांची सेटिंग करू देतो…

गुजरातच्या व्यक्तीने त्यावेळी संपर्क केल्याची माजी आमदार चव्हाण यांची माहिती सटाणा ः प्रतिनिधी ईव्हीएम मॅनेज…

3 days ago