सिन्नर: प्रतिनिधी
तक्रारदाराच्या प्लॉटच्या रेकॉर्डवरील जुन्या मालकाचे नाव कमी करून दुसऱ्या नावाची नोंद करण्यापोटी ५ हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सिन्नरच्या भूमी अभिलेख कार्यालयातील महिला उपअधीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने। आज रंगेहाथ पकडले, भूमिअभिलेख कार्यालयात लाचखोरी सुरूच असून गेल्या काही महिन्यातील तीन ते चार जण भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकारी लाच घेताना जाळ्यात अडकले आहेत. संबंधित तक्रारदाराने मनेगाव (ता. सिन्नर) येथे खरेदी केलेल्या प्लॉटचे सिटी सर्व्हे नंबर रेकॉर्डवर जुन्या मालकाचे नाव होते. त्यामध्ये बदल करून तक्रारदाराला स्वतःच्या पत्नीचे नाव लावायचे होते. यासंदर्भात, सिन्नरच्या भूमी अभिलेख कार्यालयातील परिरक्षण भूमापक उपअधीक्षक प्रतिभा दत्तात्रय करंजे यांनी सदर कामासाठी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तशा आशयाची तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात येवून करंजे यांना भूमी अभिलेख कार्यालयात लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…