ड्रग्ज माफिया भूषण पाटील व अभिषेक बलकवडे पोलिसांच्या ताब्यात

ड्रग्ज माफिया भूषण पाटील व अभिषेक बलकवडे पोलिसांच्या ताब्यात

उत्तर प्रदेश मधून घेतले ताब्यात, ललित पाटील फरारच

पळसे : प्रतिनिधी
शिंदे गावात एम डी मॅफेड्रोन चा कारखाना चालवाणारा ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील व त्याच्या एका साथीदाराला उत्तर प्रदेश येथून पोलिसांनी अटक केली आहे. मात्र ललित पाटील हा अद्याप ही फरार आहे.

मागील आठवाडयात मुंबई साकीनाका पोलिसांनी नाशिकरोड जवळील शिंदेगांव एम आय डी सी मध्ये छापा टाकून तीनशे कोटी रुपयेचा एम डी मॅफेड्रोन व साहित्य व एक संशयितास ताब्यात घेतले होते. यांची खबर नाशिक पोलिसांना नव्हती या मुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. तेव्हा पासून भूषण पाटील व त्याचा सहकारी फरार होते.
भूषण पाटील हा केमिकल इंजिनिअर असल्याने तो एम डी मॅफेड्रोनतयार करीत असत, त्याचा भाऊ ललित पाटील हा पुण्यातून तो विक्री करायचा व यांचा साथीदार अभिषेक बलकवडे हा एम डी मॅफेड्रोनची वाहतूक करून सांगितलेल्या ठिकाणी पोच करीत असत. ललित पाटील हा ससून हॉस्पिटल मधून सहज पळून गेला त्या नंतर भूषण व त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे फरार होते.
यांच्या मागावर पूणे, मुबंई सह नाशिक पोलीस होते. मात्र पूणे पोलिसांनी त्याचा त्याचा छडा लावीत उत्तर प्रदेश मधील वाराणसी मधून ताब्यात घेतले, मात्र ललित पाटील अद्याप ही फरार असुन पोलीस शोध घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *