इंदिरानगर | वार्ताहर | पांडवलेण्याच्या पायथ्याशी हॉटेल रेडिसन ब्लू च्या पाठीमागे असलेल्या मोठ्या प्लॉटमध्ये बिबट्या मुक्तपणे संचार करताना दिसला. नागरिकांनी हकलण्याचा प्रयत्न केला असता बिबट्या झाडांमध्ये गायब झाला.वन क्षेत्रपाल व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनी परिसराची पाहणी केली. मात्र बिबट्या दिसला नाही. यामुळे रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हॉटेल रेडिसन ब्लू पाठीमागे असलेल्या दोन-तीन एकरावर मोठी झाडे आहे. हॉटेलच्या आजूबाजूचा परिसर गजबजलेला असतो. परंतु मागील परिसरात झाडी आहे. या ठिकाणी दुपारी बिबट्या वावरताना रहिवाश्यांच्या लक्षात आले. नागरिकांनी त्याला पांडव लेण्याच्या जंगलात हकलण्याचा प्रयत्न केला, मात्र तो झाडात गायब झाला. त्यांनी तात्काळ वनसंरक्षक दलाला कळवून माहिती दिली. वनक्षेत्रपाल विजयसिंह पाटील ,अहिरराव व इतरांनी घटनास्थळी जाऊन बिबट्याचा शोध घेतला . त्या ठिकाणी फटाके फोडले. बिबट्या त्या ठिकाणी आजूबाजूला असल्याचे शंका रहिवाशांनी व्यक्त केली असल्याने त्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला आहे . रहिवाशांना योग्य त्या सूचना देण्यात आल्याचे वनक्षेत्रपाल पाटील यांनी सांगितले. या रस्त्यावर जवळच एकता गृह मोठा प्रकल्प झाला असून आजूबाजूला ही मोठी रहिवासी वस्ती असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे.
पाहा व्हिडीओ
नाशिक: प्रतिनिधी राज्यातील आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या आज शासनाने बदल्या केल्या. नाशिकचे पोलीस अधीक्षक म्हणून पालघर…
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…