नारळाच्या झाडानंतर आता बंगल्याच्या छतावर बिबट्यांची झुंज

नारळाच्या झाडानंतर आता बंगल्याच्या छतावर बिबट्यांची झुंज
सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर तालुक्यातील सांगवी शिवारात नारळाच्या झाडावर झुंजणार्‍या बिबट्यांपैकी एक येथून जवळच दीड हजार फुटावर असलेल्या एका रिकाम्या बंगल्यावर दिसून आल्याने शेतकर्‍यांमध्ये दहशत पसरली आहे.
सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास विजय घुमरे यांच्या बंगल्यावर परिसरातील शेतकर्‍यांनी या बिबट्याला पाहिले द्राक्ष बागेच्या जवळ खोल वाट परिसरात बंगल्यावर मुक्त संचार करताना बिबट्या दिसून आला.
रविवारी सायंकाळी शरद घुमरे यांच्या शेतातील वडाच्या झाडावरून उतरतानाही एक बिबट्या शेतकर्‍यांनी पाहिला. या झाडावरून त्या झाडावर आणि चक्क शेतकर्‍यांच्या बंगल्यावरही बिबट्या चा वावर आढळून आल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.

वनविभागाच्या कर्मचार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी नारळाच्या झाडाजवळ लावण्यात आलेल्या दोन पिंजर्‍यांपैकी एक पिंजरा बंदोबस्तासाठी मंगळवारी सकाळी खोल वाट परिसरात लावण्यात येणार असल्याची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *