वन्य जीव विभागाचे रेस्क्यू :बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी
वडाळा गाव: प्रतिनिधी
वडाळारोडवरील हॉटेल साई प्रितमच्या पाठीमागील रहदारी परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या वन्य जीव विभाग आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने जेरबंद करण्यात आला, बिबट्याचे दर्शन झाल्याने घबराट पसरली होती,
नाशिक शहरातील वडाळा रोड वरील नागजी परिसरातील हॉटेल साई प्रितमच्या मागील रहिवाशी परिसरात काल रात्री १० : ३० वाजेच्या सुमारास बिबट्याचे दर्शन काही नागरिकांना झाल्याने खळबळ उडाली होती -मोहम्मद अली रोड वरील नागजी भागात धुमाकूळ घातलेल्या बिबट्या अखेर मध्यरात्री रात्री १२:१५ जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले.
शर्तीच्या प्रयत्नानंतर प्रयत्नांनंतर बिबट्या हाती लागला बिबट्याला पाहण्यासाठी परिसरात प्रचंड गर्दी झाल्याने पोलिसांना आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना गर्दीला दूर करणे कठीण झाले होते. रहिवासींच्या व परिसरात असलेले लोकांच्या गोंधळामुळे बिबट्या घाबरून एका बंगल्यातून दुसऱ्या बंगल्यात उड्या मारत जात होता. बिबट्याच्या वावरामुळे नागरिक घाबरले होते चारही बाजूने जाळ्या टाकून बिबट्याला बेशुद्ध होणारे इंजेक्शन देत जेरबंद केले.गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने ग्रामीण भागाबरोबरच शहराच्या काही भागात धुमाकूळ सुरु आहे, त्यामुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते,या भागात बिबट्या आल्याचे समजताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती,
पाहा व्हीडिओ
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…