नर्गिंस दत्त विद्यालयातील 20 मुलींना नवीन सायकल भेट

नाशिक : प्रतिनिधी

भारतीय वंशाच्या अमेरिकेत वास्तव्य असलेल्या दातृत्वाने

नर्गिंस दत्त विद्यालयातील 20 मुलींना नवीन सायकल भेट दिल्या.
पेडल टु सक्सेस या संस्थेने शाळेतील विद्यार्थिनींसाठी अत्यंत उपयुक्त अशा 20 सायकली भेट स्वरूपात दिल्या. त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थिनींचा शालेय प्रवास अधिक सोयीस्कर, झाला आहे. ही सायकल म्हणजे केवळ एक साधन नसून, त्यांच्या शिक्षणाच्या वाटचालीतील एक महत्त्वाची गती आहे. मुलींच्या शिक्षणात येणारे अडथळे दूर करत, त्यांना आत्मविश्वास व स्वावलंबन मिळवून देणार्‍या संस्थेच्या या सामाजिक जाणिवेचे मन:पूर्वक कौतुक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नंदिनी आडके यांनी आपल्या प्रास्ताविकातून केले.
या संस्थेचे हे कार्य खर्‍या अर्थाने प्रेरणादायी व अनुकरणीय आहे, असे ऋणनिर्देश समारंभाचे अध्यक्ष तथा महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे उपाध्यक्ष माजी प्राचार्य हरीश आडके यांनी केले.
अमेरिकास्थित भारतीय व या अनोख्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी बिपिन साळुंखे,अश्विनी साळुंखे व त्यांची मुलगी अवनी साळुंखे यांनी समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे,हे लक्षात घेऊन पेडल टू सक्सेस म्हणजे चेतन काळभोर व सोनाली काळभोर यांनी गरजेतून उभारलेली चळवळ. या समूहाद्वारे सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि कृती यांचा सुंदर संगम घडवत, मुलींच्या पंखांना गती देणारे हे योगदान दिले जाते असे वर्णन केले.
सायकल मिळालेल्या विद्यार्थिनींपैकी खुशी मोरे व वैशाली खडांगळे यांनी आपले ऋणनिर्देशपर मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, ही सायकल म्हणजे केवळ एक साधन नसून, त्यांच्या शिक्षणातील वाटचालीसाठी एक महत्त्वाची गती आहे. या अनोख्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी आदिवासी सेवा समितीचे सहसमन्वयक श्रीराम शिरसाठ, नर्गिंस ऋणनिर्देश समितीचे अध्यक्ष समाधान पगार, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक पाटील, संध्या पाटील, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक रवींद्र ठाकरे, वस्तीगृह अधीक्षक मनीषा सोनवणे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांना पेढे वाटण्यात आले. भविष्यातही असेच सहकार्य लाभावे, ही अपेक्षा आपल्या संचलनातून पर्यवेक्षक शशिकांत देसले यांनी व्यक्त केली.
शाळेच्या समग्र विकासासाठी अमेरिकेच्या संस्थेने दिलेल्या या मौल्यवान सहकार्याबद्दल मनीषा पाटील यांनी ऋण व्यक्त केले. या कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *