नाशिक:प्रतिनिधी
जिल्हा शासकीय रुग्णालयात काल झालेल्या बाळ अदलाबदल प्रकरणी आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकरणी4 मुख्य वैधकीय अधिकारी,3 शिकाऊ डॉक्टर यांच्यासह एक परिचारिका तडकाफडकी निलंबित करण्यात आली आहे, नांदूर नाका येथील महिलेच्या बाळाची अदलाबदल करण्याचा प्रकार जिल्हा रुग्णालयात उघड झाला होता, या हलगर्जीपणा मुळे जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात होता, या गंभीर प्रकरणात आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.