जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठे खिंडार: ग्रामीण जिल्हाप्रमुख कार्यकर्त्यांसह भाजपात

जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठे खिंडार

ग्रामीण जिल्हाप्रमुख कार्यकर्त्यांसह भाजपात

मनमाड : प्रतिनिधी

-शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांचा विधानसभा निवडणुकीच्या नंतर पासुन प्रलंबित असलेला भाजप प्रवेश सोहळा आज मुंबई येथील भाजप कार्यलयात केंद्रीय मंत्री शिवप्रकाश केंद्रीय महामंत्री अरुण सिंग महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकारी अध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण माजी केंद्रीय मंत्री भारतीताई पवार महाराष्ट्राचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पंकजाताई पुंडे प्रवीण दरेकर मंगेश चव्हाण खासदार प्रीतम मुंडे महाराष्ट्राचे महामंत्री आणि उत्तर महाराष्ट्र प्रभारी विजय चौधरी रवी अनासपुरे राजेश पांडे आमदार देवयानी फरांदे आमदार सीमा हिरे माजी नाशिक जिल्हाध्यक्ष दादाजी जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश सोहळा संपन्न झाला यावेळी सर्व प्रमुख नेत्यांनी त्यांचे व त्यांच्यासोबत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले धात्रक यांच्या प्रवेशाला अनेक अदृश्य शक्तीने विरोध केला मात्र धात्रक यांनी सर्वांना कोलून अखेर प्रवेश घेऊन हमभी किसींसे कम नही हे दाखवून दिले.धात्रक यांच्या प्रवेशाने भाजपला मनमाड शहरासह नांदगाव तालुक्यात चांगले दिवस येतील हे तितकेच खरे आहे.
विधानसभा निवडणुकीच्या नंतर शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक हे त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार हे जवळपास निश्चित होते मात्र दात्रक यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ नये यासाठी अनेक अदृश्य शक्तींनी साम दाम दंड भेद वापरला मात्र भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना विश्वासात घेऊन धात्रक यांनी त्यांच्या समर्थक नगरसेवक बाजार समितीचे संचालक तसेच मनमाड बाजार समितीचे सभापती दीपक गोगड यांच्यासह  मुंबई कार्यालयात भाजपाच्या अनेक मातब्बर नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले असून नांदगाव तालुक्यातील राजकीय परिस्थिती ही एक हाती होते की काय असे चित्र दिसत असतानाच धात्रक यांनी समर्थकांसह भाजपा प्रवेश केल्याने तालुक्यात पुन्हा वेगळी चित्र निर्माण होईल अशी आशा राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे त्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत धात्रक  विद्यमान आमदार सुहास कांदे यांचे विरोधात लढले होते आता मात्र शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाची युती आहे आता हा गट आमदार कांद्यासोबत जोडून घेतो की नाही याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वात मोठा पक्ष असून शहराचा तसे तालुक्याचा विकास करायचा असेल तर सत्य सोबत जाणे गरजेचे आहे याशिवाय मनमाड शहरातील तसेच नांदगाव तालुक्यातील सर्व सामान्य जनतेच्या कामासाठी व विकासासाठी आपण भाजपा प्रवेश केल्याचे धात्रक यांनी स्पष्ट केले गणेश धात्रक यांना मोठा राजकीय वारसा असून दीपक गोगड हे देखील सहकार क्षेत्रात मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात भाजपाला मनमाड शहरात व नांदगाव तालुक्यात चांगले दिवस येतील हे तितकेच सत्य आहे.

यांचा झाला प्रवेश सोहळा

जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, बाजार समिती सभापती दीपक गोगड, नगरसेवक अडओकॅटे सुधाकर मोरे,प्रमोद पाचोरकर,विजय मिश्रा,लियाकत शेख,अकबर सोनावला,संतोष जगताप,चंद्रकांत परब,आनंद बोथरा, जिल्हा परिषद सदस्य अशोक जाधव यांनी प्रवेश केला

Bhagwat Udavant

Recent Posts

जिल्हा परिषद गट-गण रचनेचे प्रारूप सादर

चांदवड, सुरगाणा, मालेगाव तालुक्यात प्रत्येकी एका गटाने वाढ, संख्या 74 वर नाशिक : प्रतिनिधी जिल्हा…

2 hours ago

मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार झाले ‘पोषणदूत’

कुपोषित बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रम नाशिक : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या पोषणदूत उपक्रमांतर्गत अंतर्गत…

2 hours ago

प्रस्तावित रामवाडीतील पुलाला साइड ट्रॅक; निविदेतून वगळले

उर्वरित सव्वाशे कोटींच्या कामांना मात्र हिरवा कंदील नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने…

2 hours ago

लाखलगाव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

रात्रीच्या वेळी घरांच्या कड्या वाजवून दहशत माडसांगवी : वार्ताहर लाखलगावसह परिसरात चोरांच्या दहशतीमुळे लाखलगावचे ग्रामस्थ…

2 hours ago

लिव्ह इन रिलेशनशिप विवाहसंस्थेला पर्याय ठरू शकत नाही

लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात…

2 hours ago

अखेरच्या सोमवारी शिवभक्तांची गर्दी

नाशिक ः काल शेवटच्या श्रावणी सोमवारी रिमझिम पावसातदेखील जवळपास लाखभर शिवभक्तांनी श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी…

3 hours ago