मुंबई: मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात आरोपांची राळ उठल्यानंतर अखेर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे सोपवला आहे, काल रात्री मुख्यमंत्री, अजित पवार, विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्यात बैठक झाली होती, काल रात्रीच मुंडे यांचा राजीनामा लिहून घेण्यात आला होता,
काल संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सर्वत्र व्हायरल झाले, हे फोटो पाहून महाराष्ट्रात तीव्र संताप व्यक्त झाला, त्यामुळे धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे, विरोधकांनी मुंडेंचा राजीनामा घ्यावा यासाठी रान पेटवले होते, कालपासून अधिवेशन सुरू झाले, पहिल्याच दिवशी विरोधक राजीनाम्याची मागणी करत होते, तर करुणा मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी मुंडे यांचा राजीनामा तयार असल्याचे बोलले होते, अंजलीदमानिया यांनी वेळोवेळी हा विषय लावून धरला होता, अखेर आजच राजीनामा द्या, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते. त्यानंतर आज अखेर मुंडे यांनी राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे सोपवला.
धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिला आहे. तो मी स्वीकारलेला आहे. तो राजीनामा पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे.
— मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस