नाशिक: प्रतिनिधी
सिन्नर येथे झालेल्या तुफान पाऊस आणि वादळ वाऱ्यामुळे येथील हायटेक बस स्थानकाचे प्लॉट फार्म वरील शेड शिवशाही बसवर कोसळले, त्यामुळे खळबळ उडाली आहे. खबरदारी म्हणून बस स्थानक पूर्ण रिकामे करण्यात आले आहे. नाशिक पुणे महामार्गावर हे बस स्थानक मंत्री माणिकराव कोकाटे यांनी उभारले आहे, या स्थानकाचे मोठं कौतुक झाले होते, आज पावसाने बस स्थानकाचे शेड एका बसवर तसेच कारवर कोसळले त्यामुळे मोठे नुकसान झाले,