नाशिकरोडला अर्ज भरताना इच्छुकांकडून मोठे शक्तिप्रदर्शन

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
येत्या 15 जानेवारी 2026 ला होणार्‍या महापालिका निवडणुकीसाठी विविध पक्षांच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. शेवटच्या दिवशी (दि. 30) अर्ज भरताना इच्छुक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले.
मंगळवारी (दि. 30 डिसेंबर) सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी व काही अपक्षांनी गर्दी केली होती. अनेक विद्यमान नगरसेवकांची तिकिटे कापली गेल्याने त्यांनी ऐनवेळी इतर पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळवली. त्यामुळे प्रत्येक प्रभागात कहीं खुशी कहीं गम, असे चित्र दिसत होते. सोमवारी (दि. 29) अनेक उमेदवारांनी अर्ज भरले होत;े परंतु पक्षाचे एबी फॉर्म मिळाले नसल्याने ते थांबून होते. मंगळवारी (दि. 30) सर्वच पक्षाच्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आल्याने त्यांनी समर्थकांसह शक्तिप्रदर्शन करून अर्ज दाखल केले.


प्रभाग क्रमांक 17 मधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिनकर आढाव, प्रशांत दिवे, शोभा सातभाई, नीलम गडाख, तर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शैलेश ढगे, मंगला आढाव, मंगेश मोरे, प्रमिला मैद, शिवसेना शिंदे गटाच्या वतीने राजेश आढाव, विजया डावरे, राहुल कोथमिरे, सुशीला लोखंडे, तसेच वंचित बहुजन आघाडीतर्फे संदीप काकळीज. प्रभाग क्रमांक 18 मधून भारतीय जनता पक्षातर्फे विशाल संगमनेरे, शरद मोरे, ज्योती माळवे, सुशीला बोराडे, तर शिवसेना शिंदे गटाचे सुनील बोराडे, रंजना बोराडे, आशा पवार, तसेच शीतल ताकाटे, सुनीता भोजने या दोन महिलांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. त्यामुळे नक्की उमेदवारी कोणाला यावर आज शिक्कामोर्तब होईल. शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे चित्रा ढिकले, संजय ढिकले, प्रशांत भालेराव, रोहिणी पिल्ले महाराष्ट्र नवनिर्माण सेना.
प्रभाग क्रमांक 19 मधून भारतीय जनता पक्षातर्फे योगेश ताजनपुरे, स्वाती वाकचौरे, हेमांगी भागवत, शिवसेना शिंदे गटातर्फे पंडित आवारे, जयश्री खर्जुल, विशाखा भडांगे, शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने योगेश भोर, भारती ताजनपुरे, रुचिका साळवे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार), शोभा आवारे, शीतल साळवे, सचिन आहेर.
प्रभाग क्रमांक 20 मधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने संभाजी मोरूस्कर, सीमा ताजणेे, सतीश निकम, जयश्री गायकवाड, शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने हेमंत गायकवाड, योगिता गायकवाड, अश्विन पवार, गायत्री गाडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, शिवसेना शिंदे गटाच्या वतीने कैलास मुदलियार, सुप्रिया कदम, दुर्गा चिडे, पी. के. बागूल.
प्रभाग क्रमांक 21 मधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने नितीन खोले, श्वेता भंडारी, कोमल मेहरोलिया, जयंत जाचक, शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, ज्योती खोले, नयना वाघ, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने प्रशांत जाधव, सुधाकर जाधव, अश्विनी आवटे, अनिता निकाळे.
प्रभाग क्रमांक 22 मधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने श्याम गोहाड, सुनीता कोठुळे, नयन घोलप, मनीषा जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने विक्रम कोठुळे, गणेश खर्जुल, संध्या पवार मोनाली कोरडे, तर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने केशव पोरजे, योगेश गाडेकर, संजीवनी हंडोरे, वैशाली दाणी यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

Big show of strength from aspirants while filling up applications for Nashik Road

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *