बिहारमध्ये दोन टप्प्यात निवडणूक, 14 नोव्हेंबर ला निकाल

नवी दिल्ली: संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बिहार मधील  विधानसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले असून, दोन टप्प्यात या निवडणुका होणार आहेत. पहिला टप्पा 6 तर दुसरा टप्पा 11 नोव्हेंबरला होणार असून 14 नोव्हेंबर ला निकाल जाहीर केला जाणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेत तारखा जाहीर केल्या बिहारमध्ये एकूण 7 कोटी 42 लाख मतदार आहेत. त्यापैकी3 कोटी 92 लाख पुरुष आणि 3 कोटी 50 लाख महिला आहेत.१४ लाख मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत. 1200 मतदार एक केंद्र असे प्रमाण राहणार आहे. नितीशकुमार, राजद व काँग्रेस यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *