नाशिक

सायखेड्यात दुचाकीस्वारांचा डॉक्टरवर हल्ला

गोदावरी असोसिएशनतर्फे रास्ता रोको; तिघांविरोधात गुन्हा, दोघांना अटक

नाशिक : प्रतिनिधी
दुचाकीस्वारांनी डॉक्टरच्या कारला मागून धडक देत वाद घालून हल्ला केला. ही घटना सायखेडा (ता. निफाड) रविवारी (दि. 8) सायंकाळी भेंडाळी रोडवर घडली. याप्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल झाला असून, दोघांना अटक केली आहे.
याबाबत डॉ. प्रशांत वसंत कांडेकर यांनी सायखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर कापसे, ऋतिक कापसे व साहिल पटेल (रा. सायखेडा, ता. निफाड) यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यांपैकी आकाश व ऋतिक कापसे यांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. कांडेकर रविवारी सायंकाळी त्यांच्या ब्रिझा कारने (एमएच 15-जेएम 8311) सोनगाव येथून भेंडाळी रोडमार्गे सायखेड्यातील सिद्धिविनायक हॉस्पिटलकडे येत होते. यावेळी संशयितांनी मोटारसायकलवरून (एमएच 15-जेटी 0886) येत डॉक्टरांच्या गाडीला मागून धडक दिली. या घटनेनंतर डॉ. कांडेकर यांनी गाडी रस्त्याच्या कडेला थांबविल्यानंतर संशयितांनी त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी एका संशयिताने ‘आज तुझा जीव घेतो,’ अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, डॉक्टर हॉस्पिटलकडे पळत असताना एका संशयिताने मोठा दगड उचलून त्यांच्या पाठीवर मारल्याने त्यांना दुखापत झाली. आरडाओरड ऐकून डॉक्टरांची पत्नी मध्यस्थी करण्यासाठी आली असता, संशयितांपैकी एकाने तिचा हात धरून विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला आहे. यानंतर डॉक्टर दाम्पत्य हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर संशयितांनी सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या गेटवर येऊन काचेच्या दरवाजावर लाथा मारत दहशत निर्माण केली.ूडॉक्टरांच्या ब्रिझा कारच्या काचा फोडून सुमारे 20 हजारांचे नुकसान केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिक, तसेच गोदाकाठ मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. संशयितांना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी सोनगाव-सायखेडा रोडवर रास्ता रोको केला. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेची माहिती मिळताच निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप घुगे यांनी आंदोलकांशी संवाद साधत जमावाला शांत केले. याप्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याची नोंद सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. एम. कर्डक यांनी केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप घुगे तपास करीत आहेत.

 

दोषींवर कठोर कारवाईची मागणी

डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यानंतर सायखेडा परिसरात संताप व्यक्त होत आहे. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. परिसरात कायद्याचा धाक निर्माण करून डॉक्टर व नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे..

Bikers attack doctor in Saykheda

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

9 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

10 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

10 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

10 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

10 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

10 hours ago