नाशिक : प्रतिनिधी
नाशिक विभाग व जिल्हास्तरावर आगामी खरीप हंगामाचे नियोजन पूर्ण झाले आहे. नाशिक जिल्हयासह विभागासाठी कृषी विभागाकडून 8 लाख 84 हजार खतांची मागणी करण्यात आली होती. यापैकी 7 लाख 69 हजार मेट्रीक टन मंजूर करण्यात आले आहे. बियाणांच्या बाबतीत नाशिक विभागासाठी 1 लाख 42 हजार क्विंटल बियाणे मिळ्णार आहे. यामध्ये एकटया नाशिक जिल्हयासाठी 72 हजार 395 क्विंटर बियाणांची मागणी करण्यात आली आहे. विभागीय व जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून गेल्या काही दिवसांपासून खरीप हंगामाचे खते व बियाणांचे जोरदार नियोजन सुरु होते.
दरवर्षी कृषी विभागाकडून खरीप हंगामाचे नियोजन केले जात असून, नाशिक जिल्हा अन विभागात कुठेही शेतकर्यांना खते, बियाणांंची कमतरता भासू नये याकरिता कृषी विभाग प्रयत्नशील असतो. गेल्या वर्षी खतांसाठी शेतकर्यांमध्ये कुठेही नाराजी व आरडाओरड झाली नाही. विशेषत: कोरोनासारख्या काळात देखील कृषी विभागाने यशस्वीपणे आपले नियोजन पूर्ण करत शेतकर्यांचे हाल होणार नाही, याकरिता काळ्जी घेतली. यंदा मान्सूनचे आगमन लवकर होनार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आतापासूनच तयारीला लागला आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवडयानंतर शेतकर्यांकडून पेरणीच्या कामांना गती दिली जाते. काही शेतकरी अगदी तीसर्या ते चौथ्या आठवडयात शेतीचे कामे करणे पसंत करतात. बियाने व खते यांची कमतरता भासू नये याकरिता अनेक शेतकरी हे अगदी मे महिन्याच्या शेवटच्या आठवडयात किंवा जूनच्या पहिल्याच आठवडयात खते व बियाने घेण्यासाठी बाजारात गर्दी करीत असतात. दरम्यान खते व बियानांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाच्या भरारी पथकांची नजर राहणार आहे. विशेषत: खते विक्री करताना शेतकर्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी नाशिक जिल्हयासह, धुळे, नंदूरबार, जळ्गांव येथील कृषी विक्री केंद्रावर करडी नजर असणार आहे. नाशिक जिल्हयासाठी 72 हजार 397 क्विंटल, धुळे 26 हजार 200, नंदूरबार 13 हजार 217 व जळ्गांव जिल्हयाकरिता 31 हजार 85 क्विटल बियानांची मागणी केली आहे. या बियाण्यांमध्ये कापूस व सोयाबीनचे बियाने धरलेले नसून मका, बाजरी, मुंग, ज्वारी आदींसह खरीप हंगामातील बियाण्यांंचा समावेश आहे.
कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत…
सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या आगीचे कारण…
लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…
मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…
ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…
पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…