कापडी पिशवी वाटपासह प्लास्टिक बंदीचे आवाहन
सिन्नर ः प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भाजपा उद्योग आघाडीच्या वतीने सिन्नर शहरातून कापडी पिशवी वाटपासह जनजागृती रॅली काढून पर्यावरण संवर्धनाचे आवाहन केले. पर्यावरणाचे संरक्षण आणि जागरूकता वाढवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाद्वारे दरवर्षी दि. 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.
या दिनाचे औचित्य साधून नाशिक जिल्हा भाजपा विकास उद्योग आघाडीच्या वतीने भाजपा उद्योग विकास आघाडीचे प्रदेश सरचिटणीस तथा स्टाईसचे चेअरमन नामकर्ण आवारे, भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल जपे यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नाशिक विभागाचे प्रादेशिक अधिकारी भड, उपप्रादेशिक अधिकारी गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातून कापडी पिशवी वाटपासह जनजागृती रॅली काढण्यात आली.
बसस्थानकाशेजारील महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यास दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी नागरिकांना कापडी पिशव्यांचे वाटप करत पर्यावरण वाचविण्याकरिता प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. महात्मा फुले पुतळ्यापासून सुरू झालेली रॅली गावठा, नेहरू चौक, नवीन पूल, गणेशपेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहचली. तेथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. वावीवेस येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत रॅलीची सांगता करण्यात आली. या जनजागृती रॅलीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नाशिक कार्यालयाचे फिल्ड अधिकारी कुलकर्णी, महाजन, इटरनीस फाइन केमिकल्स लि. कंपनीचे कांडेकर, स्टाईसचे उद्योजक नरेंद्र परचुरे, पुष्कर सराफ, चंद्रकांत जाधव, संकेत काळे, ओमकार जपे आदींसह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, कर्मचारी, इंटरनीस फाइन केमिकल्सचे अधिकारी, कर्मचारी, स्टाईसमधील उद्योजक प्रतिनिधी, सिन्नर तालुका भाजपा उद्योग आघाडी महिला सेलच्या सर्व सदस्या, तसेच शहरातील नागरिक उपस्थित होते.
अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ सिडको।…
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…