नाशिक

बंडखोरीमुळे भाजपने एक जागा गमावली

अ गट

रूपाली नन्नावरे
(मते 11,817)
नयना रामवंशी
(6,402)

 

ब गट
रंजना भानसी
(11,102)
गणेश चव्हाण
(10,637)

 

क गट
दीपाली गिते
(16,642)
उर्मिला निरगुडे
(5,237)

 

ड गट
प्रवीण जाधव
(9,245)
अरुण पवार
(8,821)

 

दीपाली गिते यांना महिलांमध्ये सर्वाधिक मताधिक्य

प्रभाग 1 मध्ये भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध करतानाच भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका दीपाली गणेश गिते यांनी आपल्या विरोधी उमेदवारांचा धुव्वा उडवत तब्बल 16,642 इतकी मते घेतली. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार उर्मिला निरगुडे यांचा तब्बल 11,315 मतांच्या फरकाने पराभव केला. महानगरपालिकेच्या निवडणुकीत शहरातील सर्वच प्रभागांमध्ये महिला उमेदवार मोठ्या प्रमाणावर निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. यात सर्वच महिला उमेदवारांपेक्षा दीपाली गिते यांनी सर्वाधिक मते घेत सर्वच महिलांमध्ये सरस उमेदवार ठरल्या.

बंडखोरीमुळेच अरुण पवारांचा पराभव

प्रभाग एकमध्ये 2002 साली अरुण पवार प्रथम निवडून आले होते. त्यानंतर सलग दोन वेळा 2007 व 2012 मध्ये त्यांच्या पत्नी शालिनी पवार निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2017 मध्ये पुन्हा अरुण पवार निवडून आले; परंतु यावेळी भाजपकडून उमेदवारीसाठी आग्रही असलेले भाजप सरचिटणीस अमित घुगे, तसेच डॉ. सचिन देवरे यांनी बंडखोरी केली. त्यामुळेच त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. गोरक्षनगर भागात गेली अनेक वर्षे सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले प्रवीण जाधव यांचा विजय झाला.

म्हसरूळ भागात 1992 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. मात्र, 1997 ला भारतीय जनता पार्टीने आपले वर्चस्व निर्माण केले. ते यंदाही कायम राखण्यात स्थायी समितीचे माजी अध्यक्ष गणेश गिते यांना यश आले आहे. गतवेळी या प्रभागाला महापौरपद आणि सलग दोन वेळा स्थायी समिती सभापतिपद मिळाले. सलग दोन वेळा स्थायी समिती पद असल्याने या भागात गणेश गिते यांनी प्रभागात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभा केला. लवकरच तो पूर्णत्वास जाईल. त्यांनी केलेल्या विकासकामाचा त्यांची पत्नी दीपाली गिते यांच्यासह दोन उमेदवारांना फायदा झाला. दीपाली गिते यांचा 11 हजार 315
सर्वाधिक मताधिक्क्याने विजय झाला. मात्र, भाजपमधील अमित घुगे यांनी केलेल्या बंडखोरीचा फटका भाजपला बसल्याने 20 वर्षे घरात नगरसेवकपद राहिलेल्या अरुण पवार यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला.
प्रभाग एक हा क्षेत्रफळाने मोठा असलेला प्रभाग असून, यात म्हसरूळ गाव, मखमलाबाद गावचा परिसर, दिंडोरी रोडवरील काही भाग असलेल्या या प्रभागात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट यांच्या तुल्यबळ लढत झाली. या प्रभागात 1997 मध्ये रंजना भानसी या नगरसेविका झाल्यानंतर त्यांच्या पाच टर्म, तर 2002 साली अरुण पवार, त्यानंतर दोन वेळा त्यांची पत्नी शालिनी पवार आणि 2017 मध्ये पुन्हा अरुण पवार, अशी 20 वर्षे ते नगरसेवक राहिले. 1992 ते 2017 पर्यंत या प्रभागाला प्रभाग सभापती वगळता कुठलेही महत्त्वाचे पद लाभले नव्हते. पण 2017 च्या निवडणुकीत रंजना भानसी यांना महापौरपदाची संधी मिळाली. प्रथमच महापालिकेच्या निवडणुकीत उतरलेले गणेश गिते यांच्या रूपाने प्रभागाला सलग दोन वेळा स्थायी समिती सभापतिपद मिळाले. त्यानंतर काहीअंशी प्रभागाचा विकास करण्यात आला. यावेळी निवडणूक लागल्यानंतर प्रभागातून निवडणूक लढविण्यासाठी भाजपमध्ये 20 वषार्ंपासून सक्रिय राहिलेले अमित घुगे यांनी पक्षाकडे उमेदवारीवर दावा केला. परंतु पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली. त्यानंतर भाजपाने अरुण पवार, रंजना भानसी, रूपाली नन्नावरे, दीपाली गिते यांना उमेदवारी देत प्रभावी पॅनल निर्माण केले. गेली अनेक वर्षे गोरक्षनगर भागात सामाजिक काम करणारे प्रवीण जाधव यांनी माजी नगरसेवक गणेश चव्हाण, नयना (करुणा) रामवंशी, उर्मिला निरगुडे यांना सोबत घेत पॅनल करून भाजपला तगडे आव्हान उभे केले होते. मात्र, प्रवीण जाधव वगळता शिवसेनेला यश मिळाले नाही. आंतरराष्ट्रीय स्टेडियमसारखा महत्त्वाचा प्रकल्प, तसेच सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी होणारी विविध विकासकामे यामुळे आगामी काळात प्रभागाचा चेहरामोहरा बदलणार आहे.
या निवडणुकीत रंजना भानसी, अरुण पवार, गणेश चव्हाण वगळता दीपाली गिते, प्रवीण जाधव यांच्यासह इतर सर्वच उमेदवार नवीन होते. प्रभागात खरी लढत भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातच झाली. यात अ गटातून भाजप संकटमोचक गिरीश महाजन यांचे सहाय्यक स्वप्नील नन्नावरे यांच्या पत्नी रूपाली नन्नावरे या रिंगणात होत्या. त्यांची खरी लढत नयना रामवंशी यांच्याशी झाली. ब गटात माजी महापौर रंजना भानसी यांना माजी नगरसेवक गणेश चव्हाण यांनी चांगलीच लढत दिली. यात रंजना भानसी केवळ 465 फरकाने विजयी झाल्या. विशाल पोटिंदे हेही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून लढल्याने त्यांनीही 3,471 मते घेतली.क गटातून माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते यांच्या पत्नी या पहिल्या फेरीपासून आघाडीवर असल्याने त्यांनी सुमारे 11,315 मतांनी उर्मिला निरगुडे, अनिता पेलमहाले व वंदना पेलमहाले यांचा दारुण पराभव केला. ड गटात प्रवीण जाधव यांनी अरुण पवार यांचा 424 मतांनी पराभव केला. या गटात माजी नगरसेवक वसंतराव मोराडे यांचे चिरंजीव विश्वास मोराडे यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली. त्यांनी पहिल्याच निवडणुकीत 3,208 मते घेतली. भाजप बंडखोर अमित घुगे यांनी 3,798, तर डॉ. सचिन देवरे यांनी 819 मते घेतल्याने अरुण पवार यांना पराभवाचे धनी
व्हावे लागले.

BJP lost one seat due to rebellion

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

5 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

6 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

6 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

6 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

6 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

6 hours ago