नाशिक

नाशकात भाजप स्वबळावर लढणार

शिंदेसेनेची राष्ट्रवादी काँग्रेसशी युती; 96 : 26 चा फॉर्म्युला

नाशिक : प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून भाजप-शिंदेसेना-राष्ट्रवादीतील जागावाटपाचा घोळ काही केल्या सुटत नसल्याचे चित्र होते. भाजपच्या असहकारास वैतागून शिंदेसेना व राष्ट्रवादीने एकत्रित महापालिका निवडणूक लढण्याची घोषणा सोमवारी (दि.29) केली. शिंदेसेना 96, तर राष्ट्रवादी 26 असे जागावाटपाचे सूत्र ठरले आहे. यातून आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेकरिता काही जागा सोडल्या जाणार आहेत.
मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शिंदेसेना व राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची घोषणा केली. दरम्यान भाजप स्वबळावर आता ही निवडणूक लढणार असून मात्र युतीतील मित्रपक्षांनी भाजपला दूर ठेवून शिंदेसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र येत युती करण्याची घोषणा केली. भाजप शिंदेसेना आणि राष्ट्रवादीला कमी जागा देत होते. त्यामुळे जागावाटपावरून या तिन्ही पक्षात एकमत झाले नाही. अखेर शिंदेसेना व अजित पवारांची राष्ट्रवादीने मनपा निवडणुकीला एकत्र सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपासून या दोन्ही पक्षांत बैठकांचे सत्र सुरू होते. तर भाजपशी देखील बोलणी सुरू होती. परंतु महायुतीत जागावाटपाचा तिढा सुटत नव्हता. त्यामुळे अखेर शिंदेसेनेने व राष्ट्रवादीने भजपशी फारकत घेत दोन्ही मिळून एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महायुती न करता भाजपा स्वबळावर लढणार आहे. शिंदेसेना 90, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 30 जागा लढणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, यातील काही जागांवर अद्याप बोलणी बाकी असल्याचे बोलले जात आहे. यात शिंदेसेना मोठ्या भावाच्या भूमिकेत असणार आहे. भाजपकडून स्बबळाची तयारी असल्याने मागील काही दिवसांत विरोधी पक्षातील महत्त्वाच्या पदाधिकार्‍यांना प्रवेश दिले जात आहे. दरम्यान, भाजप फक्त चर्चेत गुंतवून ठेवून स्वबळाच्या दिशेने वाटचाल करत असल्याची रुखरुख मित्र पक्षांना आली होती. त्यामुळे त्यांनी वेळीच सावध होत, भाजपलाच दूर सारत बैठका घेऊन जागांची तडजोड करण्यात आली. शिंदेसेनेकडून मंत्री दादा भुसे, राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ्, हेमंत गोडसे, विजय करंजकर, अजय बोरस्ते, प्रवीण तिदमे आदींमध्ये बैठका सुरू होत्या.

महायुतीमधील मित्रपक्ष असल्याने आम्ही लोकसभा, विधानसभा निवडणूक सोबतीने लढवल्या. त्याचनुसार नाशिक महापालिका निवडणूकदेखील ही महायुतीतच व्हावी याकरिता पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती. याकरिता आम्ही शेवटपर्यंत वाट पाहिली. परंतु भाजपने आमच्याशी कुठलीही चर्चा केली नाही. मात्र, याचवेळी महायुतीमधीलच मित्रपक्ष राष्ट्रवादीने दोघांमिळून निवडणूक लढण्याची भूमिका मांडली होती. त्यावर अखेर दोन्हींकडील नेत्यांचे एकमत झाले असून, शिवसेना व राष्ट्रवादी, रिपब्लिकन सेना असे आम्ही एकत्रित निवडणूक लढवणार आहोत.
– अजय बोरस्ते, उपनेते तथा जिल्हाप्रमुख, शिंदेसेना

शिंदेसेना व राष्ट्रवादी महायुतीमधील हे दोन्ही छोटे भाऊ असून, भाजप मोठा भाऊ आहे. याकरिता भाजपने पुढाकार घेऊन त्यांच्याकडे महायुतीचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु त्यांच्याकडून कुठलीच चर्चा होत नसल्याने अखेर शिंदेसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे.
– मंत्री नरहरी झिरवाळ

BJP will contest on its own in Nashik
Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

10 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

10 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

10 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

11 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

11 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

11 hours ago