नाशिक: प्रतिनिधी
भाजपने एका उमेदवारासाठी प्रतिष्ठा पणास लावलेल्या प्रभाग क्रमांक 26 मध्ये भारतीय जनता पक्षाला भोपळा ही फोडता आला नाही, येथे चारही जागांवर शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले. भाजपा च्या अलका अहिरे यांना एबी फॉर्म दिल्यानंतर त्यांच्या ऐवजी अपक्ष उमेदवार यांना पाठिंबा दिला, मात्र या भागातील जनतेने शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले, विषेश म्हणजे मागील वेळेस अलका अहिरे यांनी विजय मिळवला होता, ती जागाही भाजपला गमवावी लागली,
प्रभाग २६ मध्ये ४ ही उमेदवार शिवसेना शिंदे गट विजयी झाले मात्र अधिकृत घोषणा होणे बाकी आहे )
अ) नीलेश पाटील, भाजप (कमळ),
निवृत्ती इंगोले, शिवसेना (धनुष्यबाण), (विजयी)
अशोक खोडे, काँग्रेस (हाताचा पंजा),
तानाजी जायभावे माकप (हातोडा, विळा, तारा), संदीप तांबे, अपक्ष (शिट्टी).
– –
ब) हर्षदा गायकर, शिवसेना (धनुष्यबाण), (विजयी)
ज्योती सचिन घाटोळ, माकप (हातोडा, विळा तारा), मोहिनी अशोक पवार, भाजप (कमळ),
अर्चना ज्ञानेश्वर बगडे, मनसे (रेल्वे इंजिन),
चंचल लक्ष्मण साबळे, अपक्ष (एअर कंडिशनर).
– – –
क) अलका आहिरे, भाजप (कमळ),
नयना जाधव, शिवसेना (धनुष्यबाण), (विजयी)
ललिता थोरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (तुतारी),
निर्मला पवार, मनसे (रेल्वे इंजिन),
स्वप्ना माळी, माकप (हातोडा, विळा आणि तारा), पुष्पावती पवार, अपक्ष (कपाट).
– – –
ड) रामदास मेदगे, भाजप (कमळ),
भागवत आरोटे, शिवसेना (धनुष्यबाण), (विजयी)
अशोक पारखे, शिवसेना उबाठा (मशाल),
सद्दाम शेख, काँग्रेस (हाताचा पंजा),
सचिन भोर, माकप (हातोडा, विळा आणि तारा), प्रवीण महिरे, वंचित (गॅस सिलिंडर).