राज्यात भाजपाची जोरदार मुसंडी

मुंबईत ठाकरे यांच्या सत्तेला सुरुंग; ’कमळ’ फुलले

मुंबई :
राज्यात भारतीय जनता पार्टीने जोरदार मुसंडी मारली असून, मुंबईत गेल्या तीस वर्षांपासून सत्ता भोगणार्‍या ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. महायुतीने 116 जागा जिंकत ठाकरे बंधूंंना झटका दिला. त्यामुळे मुंबईत भाजपाचा महापौर होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पार्टीने 88, शिवसेनेने 28, तर उबाठाने 65, काँग्रेसने 24, मनसेने 6, अजित पवार गटाने 3 व इतरांनी दहा जागा मिळविल्या.

मुंबईत पहिल्यांदाच भाजपचा महापौर!
देशातील सर्वांत श्रीमंत महापालिका असलेल्या बीएमसीवर आतापर्यंत शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, यंदा भाजपने मुसंडी मारत हे वर्चस्व मोडीत काढले आहे. मुख्यमंत्र्यांनी जनतेचे आभार मानताना सांगितले की, मेट्रो, कोस्टल रोड आणि ट्रान्स-हार्बर लिंक यांसारख्या पायाभूत सुविधांच्या कामावर मुंबईकरांनी विश्वास टाकला आहे.
तेजस्वी यांची वाढती लोकप्रियता, जनसमर्थन आणि मजबूत राजकीय प्रभावामुळे त्यांना महापौरपदासाठी एक मजबूत दावेदार बनवले आहे. तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई आहेत. तेजस्वी घोसाळकर यांनी 2017 च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या (तेव्हाची अविभाजित शिवसेना) तिकिटावर विजय मिळवला होता. तेव्हापासून त्या राजकारणात सक्रिय आहेत. पण तेजस्वी यांचे पती अभिषेक घोसाळकर यांची 2022 मध्ये फेसबुक लाइव्हदरम्यान गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आणि राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटले.

BJP’s strong momentum in the state

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *