भाजपचा विजयी गुलाल

भाजपचा विजयी गुलाल

ग्रामपंचायत निवडणूक, राष्ट्रवादीही सरस, कॉंग्रेसची पीछेहाट

मुंबई: राज्यातील सत्तांतरानंतर झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने सर्वासिक ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवत विजयाचा गुलाल उधळला, एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकारने सत्तेवर येताच सरपंच पदाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे गावोगावी सदस्य पदाबरोबरच थेट सरपंच पदासाठीही चुरस पहावयास मिळाली, हाती आलेल्या निकालानुसार राष्ट्रवादीनेही आपले वर्चस्व कायम राखले, तर भारतीय जनता पार्टी च्या मदतीने सत्तेवर आलेल्या शिंदे गटाला फायदा झाला, काँग्रेस चा मात्र ग्रामपंचायत निवडणुकीतही वनवास कायम राहिला, सगळीकडे भाजपा चा जोर दिसत असताना जळगाव च्या होमपीच वर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना भोपलाही फोडता आला नाही, तर शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती झालेल्या भाऊलाल तांबडे यांच्या पॅनलचा त्यांच्या गावातच दारूण पराभव झाला, प्रहरलाही जिल्ह्यात एक ग्रामपंचायत वर सत्ता मिळाली,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *