कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको..
.मनमाड चांदवड महामार्गावर केला रस्ता रोको….
बाजार समितीचे लिलाव बंद करून शेतकरी सहभागी….
सुमारे अर्धन तास धरला रस्ता रोखून…
मनमाड : अमिन शेख
कांद्याला हमीभाव मिळावा तसेच कांद्याला प्रति क्विंटल 700 रुपये भाव देण्यात यावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.मनमाड येथील बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या चांदवड मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.सुमारे अर्धा तास हा रस्ता रोको करण्यात आला यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आज सकाळच्या सत्रात सुरू असलेले कांद्याचे लिलाव बंद करत शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे या रस्ता रोको मध्ये सहभाग नोंदवला यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.व कांद्याला 3000 रुपये हमीभाव देण्यात यावा व प्रति क्विंटल 700 रुपये अनुदान देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली तर बाजार समितीच्या वतींर शेतकऱ्यांकडुन प्रति वाहन 5 रुपये घेण्यात येणारी फी देखील रद्द करावी अशी मागणी देखील करण्यात आली.या मागण्याचे निवेदन बाजार समितीचे सचिव बाळासाहेब राठोड यांना देण्यात आले.
दारूच्या नशेत पतीने पत्नीला पेटवले महिला गंभीर जखमी; सातपूरची घटना सातपूर : प्रतिनिधी सातपूर नाशिक…
स्वयंपाक करत असताना गॅस शेगडीवरील काच फुटली, गृहिणी बालंबाल बचावली सिडको : विशेष प्रतिनिधी चुंचाळे…
नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर कार दुचाकी अपघातात पती-पत्नी ठार ; दोन जण गंभीर जखमी मनमाड :आमिन…
बलात्काराच्या घटनेने नाशिक हादरले पतीला जामीन मिळवून देण्याचा बहाणा करून युवतीवर अत्याचार नाशिक :प्रतिनिधी…
विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांना राष्ट्रपती पदक नाशिक: प्रतिनिधी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती पदक…
संजय दराडेंच्या रूपाने मखमलाबादच्या शिरपेचात तुरा " मखमलाबादचे भूमिपुत्र संजय दराडे यांना गुणवंत सेवेसाठी राष्ट्रपती…