नाशिकमध्ये कर्नाटक बँकेच्या फलकाला काळे फासले

नाशिक : प्रतिनिधी

नाशिक’ सीमावाद पेटला असतानाच नाशिकमध्ये देखील त्याचे पडसाद उमटले, जुना गंगापूर नाका येथील कर्नाटक बँकेच्या फलकाला स्वराज्य संघटनेने फलकाला काळे फासले, काल महाराष्ट्रातील ट्रकांवर हल्ला करण्यात आला होता त्याचे पडसाद आज नाशिकमध्ये उमटले नाशिक मधील स्वराज्य स्वराज्य संघटनेच्या वतीने करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली नाशिक मधील कर्नाटका बँकेच्या नावाला काळे फासून  कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देऊन निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी कर्नाटक सरकार मुर्दाबाद कर्नाटकी मुख्यमंत्री तुमचे करायचं काय खाली डोके वरती पाय हमसे जो टकरायेगा मिट्टी मे मिल जायेगा स्वराज्य संघटनेचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणां देत निषेध आंदोलन करण्यात आले.. राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनासुद्धा स्वराज्य संघटनेचे आवाहन आहे .या कर्नाटकी सरकारला तुम्ही जाब विचारा हे आपल्या अंगावर येत असेल तर यांना शिंगावर घ्यायला मागे पुढे बघू नका या महाराष्ट्रातील सबंध नागरिक जनता तुमच्या सोबत आहे जर प्रत्युत्तर दिले नाही तर स्वराज्य संघटना स्वतः कर्नाटकात जाऊन त्या ठिकाणी यांना प्रत्युत्तर देईल, यावेळी आंदोलनात स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर, स्वराज्य संघटनेचे निमंत्रक आशिष हिरे ,प्रमोद जाधव, सुभाष गायकर, भारत पिंगळे, सागर जाधव ,वैभव दळवी, शुभम देशमुख, दिनेश नरवडे ,ज्ञानेश्वर कोतकर , किरण डोके, अर्जुन पाटील, संजय तुपलोंढे, स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *