बोधलेनगरला बांधकाम व्यावसायिकाने
खोदलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका
नाशिक : प्रतिनिधी
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या बोधले नगर परिसरातील एका प्रख्यात बिल्डरने सर्व्हे क्रमांक 825 मध्ये
बांधकामाच्या साईटवर गेल्या आठ महिन्यापासून मोठ्या प्रकल्पासाठी 100 X 100 मीटर आणि 30 मीटर खोल असे मोठमोठे खड्डे केलेले आहेत.काही तांत्रिक अडचणीमुळे काम बंद असल्यामुळे या खड्ड्यांमध्ये अनेक महिन्यापासून साचलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उद्भवला आहे.
संबंधित बिल्डरने एक तर काम सुरू करावे.अथवा या दुर्गंधीयुक्त पाण्याची विल्हेवाट लावण्यात यावी अशी मागणी परिसरातील संतप्त रहिवाशांकडून होत आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त तसेच पूर्व विभाग विभागीय अधिकाऱ्यांपासून ते आरोग्य अधिकाऱ्यांपर्यंत तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाला देखील निवेदन देण्यात आले. तथापि, या बिल्डर नामवंत असल्यामुळे रहिवाशांच्या तक्रारीला प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे.महापालिका व पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी नंदन बगाडे, रमेश पाटील माधुरी जैन, बापू शौचे,रमेश पगारे, खैरे, क्षीरसागर, जेजुरकर, कडाळे, बेंडकुळे, महिंद्र निकमसह परिसरातील त्रस्त नागरिकांनी केली आहे.
कारवाई होत नसल्याने नाराजी
या मोठ्या प्रकल्पावर बिल्डर तर्फे सुरक्षारक्षक नाही. मोकळ्या भूखंडामध्ये गाजरगवत वाढलेले असुन बांधकामात पाण्याचा वापर करण्यासाठी मोठ्या खड्ड्यात साचलेल्या घाण पाण्यामुळे रोगराई पसरून मलेरिया,डेंग्यू सदृश्य डासांची निर्मिती झाल्यामुळे आणि अस्वच्छतेमुळे परिसरातील नागरिक विविध आजाराने त्रस्त झाले आहेत. महापालिकेने तात्काळ पाहणी करून कारवाई करावी.यासंदर्भात महानगरपालिकेला वारंवार लेखी निवेदन तक्रारी या ऑनलाईन कंप्लेंट ईमेल द्वारे मुख्यमंत्र्यांना तसेच संबंधित विभागांना केल्या त्याची प्रत मुख्यमंत्री कार्यालयाने महापालिका आयुक्तांना तसेच पोलीस प्रशासनाला पाठवली आहे.दरम्यान नागरिकांच्या या मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आणि लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.
मोठ्या खड्ड्यात साचलेल्या दुर्गंधीयुक्त दुषित पाण्याच्या प्रश्नाबरोबर लहान मुले खेळायला जातात या पाण्यात बुडून मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण ? याठिकाणी बांधलेल्या शेडमध्ये टवाळखोरांचा तसेच गुन्हेगारी वृत्ती असलेल्या अल्पवयीन तसेच गुंडांचा वावर वाढला असून दारूच्या पार्ट्यामुळे तसेच गांजा सारखे अमली पदार्थांचे व्यसनांमुळे महिलांच्या छेडखानीत वाढ झाली असून नुकतेच आंबेडकरवाडीला रंगपंचमीला गाजलेले दुहेरी हत्याकांड या ठिकाणापासून अवघे 200 मीटर अंतरावर आहे. संभाव्य घटना टळावी यासाठी उपनगर पोलिसांनी बंदोबस्त करून रहिवाशांना दिलासा द्यावा.
गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…
नाशिक : प्रतिनिधी एसएमबीटी मेडिकल सायन्सेस अॅण्ड रिसर्च सेंटर, एसएमबीटी डेंटल कॉलेज संगमनेर, एसएमबीटी इन्स्टिट्यूट…
नाशिक : प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी रवींद्र…
कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…
कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…
सिडको : विशेष प्रतिनिधी दहा रुपयाचे सिगारेट 11 रुपयाला का विकतो, याचा जाब विचारल्याने टपरी…