नाशिक

तुळजापूरजवळ बोलेरोला अपघात; चासचे तीन तरुण ठार

तामलवाडी गावाजवळील घटना;सहा गंभीर जखमी,
सिन्नर ः प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी गावाजवळ सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर कटारे मिल समोर मंगळवारी (दि.21) सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास धावत्या बॅलेरो गाडीचे टायर फुटून गाडी उलटल्याने तिघांचा जागेवर चिरडून मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. निखिल रामदास सानप (23), अनिकेत बाळासाहेब भाबड (23), अथर्व शशिकांत खैरनार (22) सर्व रा. चास, ता. सिन्नर असे मृत तरुणांची नावे आहेत. या घटनेमुळे चाससह भोजापूर खोरे परिसरावर शोककळा पसरली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चास येथील नऊ भाविक बॅलेरो गाडीने (क्र.एम.एच 12 ई.एक्स 3211) सोमवारी (दि.20) रात्री 10 च्या दरम्यान तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघाले होते. मंगळवारी सोलापूरहुन तुळजापूरच्या दिशेने जात होते. तूळजापूर अवघे 15 मिनीटांच्या अंतरावर राहीले असतांना तामलवाडी हद्दीत असलेल्या कटारे स्पीनिंग मिलजवळ पहाटे 6.30 वाजेच्या दरम्यान धावत्या गाडीचे पाठीमागील उजवे टायर अचानक फुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला खड्‌ड्यात जाऊन पलटी झाली. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेत जीपमधील जखमींना बाहेर काढले. यानंतर त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात निखिल रामदास सानप, अनिकेत बाळासाहेब भाबड, अथर्व शशिकांत खैरनार यांचा जागीच मृत्यू झाला. तर दीपक बबन बिडगर (23), तुषार दत्तात्रय बिडगर (21) हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर सोलापूर येथील स्पर्श हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर गणेश ज्ञानदेव खैरनार (35), जीवन सुदाम ढाकणे (26), शंकर बाळासाहेब भाबड (23), पंकज बाळासाहेब खैरनार (28) हे चौघे किरकोळ जखमी झाले आहेत.
दरम्यान या अपघाताची माहिती मिळताचा तामलवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या पथकाने, आयआरबीच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी सोलापूरला पाठवले. या अपघातात मृत्यू झालेल्या तिघांच्या पार्थिवांचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. तर तामलवाडी पोलिसांनी पंचनामा करत अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

7 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

7 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

8 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

8 hours ago