नाशिकरोडला संशयिताला अटक
नाशिकरोड : प्रतिनिधी
प्रेयसीने प्रियकराशी बोलणे व भेटणे बंद केल्याने याचा प्रियकराला राग आल्याने संतप्त झालेल्या प्रियकराने प्रेयसीला मारहाण करून एका धारदार शस्त्राने तिच्यावर हल्ला करून जखमी केल्याचा प्रकार देवी चौक , नाशिकरोड परिसरात घडला . याप्रकरणी प्रेयसीच्या तक्रारीनंतर नाशिक रोड पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे .
पीडित तरुणी ही जेलरोड परिसरात राहणारी असून , प्रियकरसुद्धा जेलरोड परिसरात राहतो . शुभम अरुण घोलप असे प्रियकराचे नाव असून , त्याची प्रेयसी ही नाशिकरोड परिसरातील देवीचौकातील एका ज्वेलर्सच्या दुकानात काम करते . गेल्या पाच ते सहा वर्षांपासून दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे . परंतु , गेल्या काही दिवसांपासून प्रेयसी ही
शुभमबरोबर बोलत नव्हती तसेच त्याला भेटतसुद्धा नव्हती . त्यामुळे शुभमचा राग अनावर झाला व त्याने सदर प्रेयसीला देवीचौकात गाठले . त्यानंतर दोघांचे भांडण झाले . भांडणानंतर प्रियकर शुभम घोलप याने तिला मारहाण केली . जवळ असलेल्या कटरसारख्या धारदार शस्त्राने तिच्या डाव्या हाताच्या मनगटावर हल्ला करून जखमी केले .
या घटनेनंतर प्रेयसीने तातडीने पोलीस स्टेशन गाठले व शुभम घोलप विरुद्ध तक्रार दाखल केली . या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने शुभमला अटक केली असून , पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश नायदे , सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके , हवालदार हिरे करीत आहेत .
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…