पानेवाडी प्रकल्पातील टँकर चालकांचा संप मागे
नाशिक : प्रतिनिधी
मनमाड पानेवाडी येथे एचपीसीएल बीपीसीएल तिन्ही कंपन्यांच्या टँकर चालकांनी संप पुकारला होता, मात्र चर्चेनंतर हा संप मागे घेण्यात आला असून, टँकर रस्त्यात उभे राहणार नाही असे आश्वासन देण्यात आले, त्यानंतर हा संप मागे घेण्यात आला,सहा जिल्ह्यांना होणारा पेट्रोल डिझेलचा पुरवठा पूर्णपणे थांबला होता, त्यामुळे इंधन पुरवठा खंडित होऊन टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती, भरलेले किंवा रिकामे टँकर डेपोच्या आत मध्ये लावले गेले पाहिजे . किंवा ते ज्या पंपांवर पाठवायचे तिकडे भरलेले टँकर निघून गेले पाहिजे. मात्र ते परिसरातील रस्त्यावर उभे केले जातात. त्यामुळे परिसरात अपघात होतात, या भागातील लोकांना त्रास होतो. टँकरमधून पेट्रोल, डिझेल चोरी सारख्या घटना घडतात. इंडियन ऑइलच्या डेपो समोर नागापूर ग्रामस्थ व टँकर चालक व मालक यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर ग्रामस्थांनी उभ्या असलेल्या गाड्यांच्या काचा फोडल्या. गॅस प्लांट मधून निघालेल्या एका चालकास मारहाण झाली. त्यानंतर ड्राइवर लोकांनी गाड्या भरण्यास नकार दिला होता.