अमोल मिटकरी यांचा निषेध
नाशिक : प्रतिनिधी
ब्राह्मण समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे ब्राह्मण महासंघाने आ. अमोल मिटकरी यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. यावेळी अमोल मिटकरी यांच्या निषेधाच्या घोेषणा देण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्या त आलेल्या मोर्चानंतर जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.भगवे झेंडे, भगवी वेशभूषा केलेल्या कार्यकर्त्यांसह यावेळी आमदार देवयानी फरांदे, अतुलशास्त्री भगरेगुरुजी, लक्ष्मण सावजी, धनंजय बेळे, सतीश शुक्ल यांच्यासह भाजपाचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.