भूमिअभिलेखमध्ये लाचखोरी थांबेना

भूमिअभिलेख मध्ये लाचखोरी थांबेना

लिपिकाला 40 हजाराची लाच घेताना पकडले

 

नाशिक: भूमिअभिलेख विभागाच्या अधिक्षकास मागील महिन्यात लाच घेताना पकडल्याची घटना घडली होती, मात्र या विभागातील लाचखोरी थांबण्यास तयार नाही, आजभूमिअभिलेख विभागाच्या लिपिकला 40 हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले, नीलेश शंकर कापसे, राहणार मखमालाबाद असे लाचखोर लिपिकाचे नाव आहे, तक्रारदार यांच्या मालकीच्या पळसे येथे

शेती गट क्रमांकाची मोजणी करून त्यामध्ये असलेले पोट हिस्सा खुणा दाखवून त्याबाबत कच्चा नकाशा काढून देण्यासाठी प्रत्येक गटाचे दहा हजार याप्रमाणे 40 हजार आणि शिक्के मारण्यासाठी10 हजार असे 50 हजार प्रत्येकी अशा चार गटाचे मिळून 2 लाख रुपये मागितले होते, परंतु तक्रारदार यांनी फक्त हद्दीच्या खुणा दाखवून देण्यासाठी 40 हजार देण्याची तयारी दाखवली, त्याप्रमाणे 40 हजार रुपये स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडले, पोलीस निरीक्षक संदीप घुगे, हवालदार एकनाथ बाविस्कर, प्रकाश महाजन, नितीन नेटरे यांनी हा सापळा यशस्वी केला, पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे- वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहालदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *