नाशिक

नाशकात मोठे प्रकल्प आणणे हीच केशुब महिंद्रा यांना खरी श्रद्धांजली ठरेल-ना. भुसे

नाशिक: प्रतिनिधी

महिंद्रासह अन्य कंपन्यांनाशी आपण प्रत्यक्ष संवाद साधणार.वेळप्रसंगी सवलती देऊन मोठे प्रकल्प नाशकात आणण्याचा आपण प्रयत्न करू आणि तीच केशुब महिंद्रा यांना खरी श्रद्धांजली ठरेल,असे उद्गार नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी काढले.
नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रातील महत्त्वाचे योगदान असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरमन केशुब महिंद्रा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी औद्योगिक व सामाजिक संघटनांच्या वतीने सातपूर येथील बीएलव्हीडी हॉटेलमध्ये आयोजित नाशिक मधील सर्व औद्योगिक संघटना सर्व सामाजिक संघटना व सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी नाशकात भव्य जागेत विस्ताराचे स्वप्न केशुब महिंद्रा बघितले होते मात्र काही करणास्तव त्यांचे हे स्वप्न सकार न झाल्याने तो प्रकल्प चाकणला गेला अशी खंत शोकसभेत निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांनी बोलून दाखविली होती त्याला उत्तर देतांना ना.दादा भुसे यांनी वरीलप्रमाणे वक्तव्य केल्याने त्याला विशेष महत्व आहे.
नाशिकसह भारतभर लाखो चुली पेटविण्याचे काम केशुब महिंद्रा यांनी केले. ते शिस्तबद्ध व सचोटीचे जीवन जगले. औद्योगिक क्षेत्रात उंच शिखर गाठूनही त्यांचे पाय मात्र सतत जमिनीवरच राहिले,अशा शब्दांत ना. भुसे यांनी केशुब महिंद्रा यांच्या कार्याचा गौरव केला. नाशिकच्या विकासासाठी तसेच रोजगारनिर्मितीसाठी आपण सारे एकत्र बसून योग्य तो निर्णय घेऊ या,असेही ना. भुसे पुढे म्हणाले.
शोकसभेत महिंद्रा अँड महिंद्राचे माजी उपव्यवस्थापक अशोक सोनवणे, हिरामण आहेर, महिंद्राचे विद्यमान उपमहाव्यवस्थापक कर्नल बॅनर्जी, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, ऊर्जा युवा फाउंडेशनचे अध्यक्ष अजय बोरस्ते, नाईसचे अध्यक्ष विक्रम सारडा ,रा. स्व.संघाचे शहर संघचालक विजय कदम,मविप्रचे सरचिटणीस एड.नितीन ठाकरे, अभय कुलकर्णी,भाजपाचे महानगराध्यक्ष गिरीश पालवे,निपमचे अध्यक्ष प्रकाश बारी,नरेडकोचे सुनील गवांदे, शिरीष भावसार आदींनीही आपल्या शोकभावना व्यक्त कारतांना केशुब महिंद्रा यांच्या आठवणींना उजाळा दिला.केशुब महिंद्रा कर्णापेक्षाही उदार होते.त्यांनी आयुष्यभर बिझिनेस नव्हे तर माणुसकीला प्राधान्य दिले. नाशिकच्या विकासात त्यांचे भरीव योगदान आहे. त्यांनी कधीच जातीभेद मानला नाही अशा शब्दांत मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ नागपूर दौऱ्यावर असल्याने ते कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत.त्यांच्या स्नुषा सौ. शेफाली भुजबळ यांनी यावेळी त्यांचा शोकसंदेश वाचून दाखविला.
कार्यक्रमास राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, निमाचे सचिव राजेंद्र अहिरे, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे राजेंद्रनाना फड, चेंबरचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ, सरचिटणीस ललित बूब, राजेंद्र वडनेरे, विराज गडकरी आदींसह सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ashvini Pande

Recent Posts

शेतकऱ्यांचे दिल्लीत कांद्याच्या माळा घालून अर्धनग्न आंदोलन

कांदा प्रश्नासाठी शेतकऱ्यांचे दिल्लीत कांद्याच्या माळा घालून अर्ध नग्न आंदोलन स्वतंत्र भारत पक्षाचा आंदोलकांना पाठिंबा…

2 days ago

सिडकोत हिट अँड रन; शॉपिंग सेंटरजवळ झोपलेल्या व्यक्तीचा वाहनाखाली चिरडून मृत्यू

शॉपिंग सेंटरजवळ झोपलेल्या व्यक्तीचा वाहनाखाली चिरडून मृत्यू सिडको : दिलीपराज सोनार जुने सिडको परिसरातील शॉपिंग…

3 days ago

लाडक्या बहिणींबाबत शासनाने घेतला आता हा निर्णय

लाडकी बहीण योजनेच्या केवायसीला स्थगिती लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मुंबई: राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा…

4 days ago

राधाकृष्ण नगरात स्वयंघोषित भाईचा राडा

राधाकृष्णनगरमध्ये परप्रातीय स्वयंघोषित भाईचा राडा गल्लीतील नागरिकांना कापून टाकण्याची धमकी देत दहशत सातपूर : सातपूर…

4 days ago

अपघातग्रस्त तरुणांवर उपचारास सिव्हिलचा नकार, छावा संघटना झाली आक्रमक, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करणार तक्रार

जिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्णांना दाखल करण्यास नकार — छावा क्रांतीवीर सेनेकडून रुग्णालय प्रशासनाचा तीव्र निषेध!…

4 days ago

वृद्धेच्या गळ्याला चाकू लावत उकळले वीस लाख, पवन पवार विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल

सिडको : विशेष प्रतिनिधी वृद्धेच्या घरी जाऊन चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत तिच्याकडून…

4 days ago