जातेगावमधील घटना; घरगुती वादातून प्रकार, अध्यार्र् तासात उकल
बोलठाण : वार्ताहर
घरगुती कारणाचा राग मनात धरून मुलाने रात्री घरात झोपलेल्या वडिलांचा डोक्यात लोखंडी पाइप घालून खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. 4) जातेगाव (ता. नांदगाव) येथे उघड झाली. या प्रकरणात मुलाने वडिलांचा अज्ञात व्यक्तीकडून खून झाल्याचा बनाव केला. मात्र, पोलिसांनी या घटनेचा अर्ध्या तासात तपास लावत नराधम मुलास ताब्यात घेतले.
जातेगाव येथील शेतकरी विठ्ठल तुकाराम गायकवाड (वय 58) व मुलगा श्रीकृष्ण उर्फ सावता विठ्ठल गायकवाड (वय 20) यांच्यात काही दिवसांपूर्वी घरगुती वाद झाला होता. त्यामुळे मुलगा सावता गायकवाड याच्या मनात राग होता. रविवारी रात्री साडेअकरादरम्यान दबा धरून बसलेल्या मुलाने घरात गाढ झोपलेल्या वडिलांच्या डोक्यात व तोंडावर लोखंडी पाइप मारला. यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी त्याने वडील मृतावस्थेत आढळल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दिगंबर भदाणे पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणात वडिलांचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याचे संशयित सावता गायकवाड सांगितले. मात्र, पोलिसांनी मृतदेहाची प्रत्यक्ष पाहणी केली असता वेगळा संशय आला. पंचनाम्यानंतर सदर मृतदेह विच्छेदनासाठी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. खुनाचा संशय वाटल्याने तत्काळ तपासाची सूत्रे फिरवत संशयित मुलगा सावता याची कसून तपासणी करत त्याला खाकीचा धाक दाखवताच आरोपी सावता याने घरगुती भांडणाचे कारण सांगत वडिलांचा खून केल्याचे कबूल केले. त्यानंतर त्याला पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. सहाय्यक न्यायवैद्यक प्रयोगशाळा पथकानेही त्वरित दाखल होत कसून तपासणी करत पुरावे जमा केली. दिवसभर घटनास्थळी तणावपूर्ण शांतता असल्याने पोलिस प्रशासनाने हजर राहून बंदोबस्त ठेवला. प्राप्त पुरावे आणि आरोपीच्या कबुली जबाबावरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी पोलिस निरीक्षक दिगंबर भदाणे, सहायक निरीक्षक सतीश गावित,पोलिस उपनिरीक्षक संतोष बहाकर , पोलिस हवालदार भास्कर बस्ते, पोलिस अंमलदार दत्तात्रय सोनवणे यांनी अवघ्या अर्ध्या तासात सदर खुनाचा तपास लावल्याने पोलिस पथकाचे कौतुक केले जात आहे. एकुलत्या मुलाने केलेल्या जन्मदात्या बापाच्या खुनाच्या दुर्दैवी घटनेबाबत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Brutal murder of biological father by son
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…