लासलगांव मध्ये बीएसएनएल मोबाईल सेवा ३ दिवसांपासून ठप्प
लासलगाव:-समीर पठाण
मोबाईल कंपन्यामध्ये ग्राहक वाढविण्यासाठी तीव्र स्पर्धा सुरू असतानाच लासलगाव शहरात “बीएसएनएल‘ सेवे चा मात्र पुरता बोजा उडाला आहे. ग्राहकांना योग्य आणि तत्पर सेवा मिळत नसल्याने दिवसेंदिवस “बीएसएनएल‘ पासून ग्राहक दुरावत आहेत. लासलगाव मध्ये मोबाइल सेवा मागील तीन दिवसांपासून विस्कळीत असून त्याकडे सबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे यामुळे बीएसएनएल‘ चे ग्राहक पुरते हैराण झाले आहे .
उगाव जवळ बीएसएनएलचे काम सुरू असल्याने लासलगाव मध्ये बीएसएनएलची मोबाईल सेवा पूर्णता विस्कळीत झाली आहे.भ्रमणध्वनी न लागणे, आवाज अस्पष्ट असणे, संभाषण पूर्ण होण्याआधीच अचानक संपर्क तुटणे, स्वत:चा आवाज स्वत:च्याच कानावर येणे आदी तक्रारी ग्राहकांमधून वारंवार केल्या जातात. हीच गत इंटरनेट सेवेची आहे. इटरनेट सेवेत व्यत्यय येत असल्याने याचा बँकिंग सेवेवर परिणाम होत आहे. परिणामी अनेक ग्राहकांचे व्यवहार खोळंबतात. एवढेच नव्हे तर अनेकदा बँकांचे व्यवहारच बंद राहण्याची वेळ ‘बीएसएनएल’मुळे येत आहे. त्यामुळे संतापलेल्या ग्राहकांनी भ्रमणध्वनी सेवेतील गलथानपणास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, ग्राहकांना उत्कृष्ट सेवा मिळावी अशी मागणी ग्राहक करत आहे.
“बीएसएनएल‘ची शहरातील मोबाईल सेवा वारंवार खंडित होत असल्याने ते ग्राहकही इतर कंपन्यांची सेवा घेऊ लागले आहे. “बीएसएनएल‘कडे जो कर्मचारी वर्ग आहे, त्याचेही योग्य नियोजन केले जात नाही.गेल्या तीन दिवसांपासून मोबाईल सेवा विस्कळीत झाल्याने ग्राहक हतबल झाले आहे.
भानुदास बकरे,लासलगाव
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…