नगरसेवकांच्या मागण्यांमुळे अंदाजपत्रकाचा फुगवटा?

मनपाचे अंदाजपत्रक साडेतीन हजार कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिका प्रशासनाने 2026-27 या आर्थिक वर्षाचे 3011.85 कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. त्यानंतर स्थायी सदस्यांनी अंदाजपत्रकावर अभ्यास करण्यासाठी वेळ मागितला होता. दरम्यान, अंदाजपत्रकाच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे. नगरसेवकांकडून प्रभागातील विविध कामांची पत्रे स्थायीकडे प्राप्त होत असल्याने त्यामुळे चालू आर्थिक वर्षातल्या अंदाजपत्रकात फुगवटा वाढून ते साडेतीन हजार कोटींच्या पुढे जाण्याची दाट शक्यता आहे.
मनपाच्या 31 प्रभागांतील रस्ते, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, आरोग्य व विद्युत कामांसाठी मोठ्या प्रमाणावर प्रस्ताव स्थायी समितीकडे दाखल होत आहेत. त्यामुळे स्थायी समिती जेव्हा हे अंदाजपत्रक महासभेला सादर करेल त्यावेळी साडेतीन हजार कोटींच्या सदर अंदाजपत्रक जाण्याची शक्यता आहे. आयुक्त मनीषा खत्री यांनी स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप यांना सोमवारी (दि.2) अंदाजपत्रक सादर केलेे. त्यात 143.09 कोटींची आरंभी शिल्लक धरून 3011.85 कोटींचे अंदाजपत्रक मांडण्यात आले आहे. नव्याने निवडून आलेल्या 122 आणि 10 स्वीकृत अशा 132 नगरसेवकांसाठी दोन वर्षांत मिळून 100.32 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येकी नगरसेवकास 76 लाखांचा विकास व स्वेच्छा निधी मिळणार आहे. असल्याने नगरसेवकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. मात्र, स्थायी सदस्यांनी अंदाजपत्रकावर सखोल अभ्यासासाठी वेळ मागितला आहे. उत्पन्नवाढीचे नवे स्रोत, पाणी व मलनिस्सारणासाठी ठोस तरतूद, मनपा रुग्णालयांतील सुविधा, सातपूरसारख्या भागांत प्रशासकीय इमारतींची गरज अशा मुद्द्यांवर सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. वाढत्या मागण्यांमुळे प्रभाग विकास निधी 30 लाखांवरून 50 लाखांपर्यंत नेण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

उद्या स्थायी सभेसह विशेष महासभा

येत्या शुक्रवारी (दि. 6) सकाळी पावणेदहा वाजता स्थायी सभा व त्यानंतर दुपारी बारा वाजता विशेष महासभा होणार आहे. यावेळी सुधारित 2026-27 चे अंदाजपत्रक मंजुरीसाठी मांडले जाईल. स्थायी सभापती मच्छिंद्र सानप यांच्या अध्यक्षतेखाली, तर विशेष महासभा महापौर हिमगौरी आडके यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. ही महासभा खड्डे, पाणी व ड्रेनेज यावर चांगलीच गाजणार आहे.

Budget inflated due to demands of corporators?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *