सिडको: विशेष प्रतिनिधी
मुंबई महामार्गावरील हॉटेल एक्सप्रेस इन समोर भिषण अपघात होऊन बुलेट चालक तुळजाभवानी चौक सिडकोतील भिका जाधव या इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आयशर टेम्पो यांच्यात अपघात झाला, बुलेट चालकाला धक्का लागल्याने बुलेट चालकाचा हकनाक बळी गेला. या अपघातानंतर तब्बल १तास महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.ट्रक नाशिककडुन मुंबईकडे जात होता तर टाटा आयशर हा विरुद्ध दिशेने जात असतांना समोरासमोर धडक दिली या दोघा वाहनांच्या अपघाचा धक्का लागल्याने शेजारून जाणा-या बुलेटचालक भिका जाधव यांचा मृत्यू झाला.