नाशिक

सराफ दुकान फोडून चार लाखांचा ऐवज लंपास

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील कायदा व्यवस्थेचा प्रश्‍न पुन्हा निर्माण झाल्याचे चित्र आहे.शहरातील पेठ रोड परिसरातील सराफ दुकानाचे कुलूप अज्ञातानी  तोडून सोन्याचे दागिने व चांदी असा सुमारे चार लाखांचा ऐवज चोरल्याची घटना उघकडीस आली आहे. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की ,फिर्यादी वैभव बबनराव भोसले (रा.ओमंकार दर्शन अपार्टमेंट, मेहेरधाम पंचवटी) यांचे पेठ रोडवरील बच्छाव हाॅस्पिटल समोर प्रसिद्धी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या बंद दुकानाचे कुलूप तोडून चोरी केली. यात सात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व दोन किलो चांदी असा सुमारे 4 लाख 5 हचार रूपये किमतीचा ऐवज घरफोडी करून नेला. ही घटना काल दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी  पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञा चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डंबाळे करीत आहेत.
Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

7 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

7 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

7 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

8 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

8 hours ago