सिडको : विशेष प्रतिनिधी
आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीची एक गंभीर घटना समोर आली असून, अज्ञात चोरट्यांनी तब्बल पाच लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.
फिर्यादी प्रकाश दिगंबर ताजनपुरे (वय 45, रा. काव्या सदन, वेदांतनगर, भिलवाडी, नादूर गाव) हे दुपारच्या सुमारास घर बंद करून बाहेर गेले होते. त्यानंतर पुन्हा रात्री 10.30 वाजता घरी परत आल्यानंतर त्यांना घरफोडी झाल्याचे लक्षात आले. अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाज्याचा कोयंडा तोडून प्रवेश केला.
हॉलमधील लोखंडी कपाट व देवघरातील लाकडी ड्रॉवरमधून एक मोठी व एक छोटी मणी मंगळसूत्र (24 हजार), डोरले (20 हजार), सोन्याची चेन व ओमपान (22 हजार), दोन मुलांचे अंगठे, ओमपान, बाळी व नथ (20 हजार), चांदीचे कडे व शिक्के मिळून 50 भार चांदी (20 हजार), रोख रक्कम 2 लाख 50 हजार, सोन्याची पोत (68 हजार), वेढे (60 हजार), आणखी एक चेन व ओमपान (60 हजार) असा एकूण 5 लाख 44 हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी झाली. या चोरीचा तपास आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजुळे पुढील तपास करत आहेत.
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…
जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…