नाशिक : प्रतिनिधी
नाशिक मुंबई महामार्गावर घोटी टोल नाक्याजवळ ट्रकने पेट घेतल्याची घटना घडली आहे.सदर घटना अशी की कुरिअरचे पार्सल घेऊन जाणाऱ्या ट्रकने पहाटेच्या सुमारास अचानक पेट घेतला. घटनास्थळी असलेल्या टोल कर्मचाऱ्याला ट्रकने पेट घेतल्याची बाब लक्षात येताच ड्रायव्हरला ट्रक बाजूला घेण्यास सांगितले. टोल कर्मचार्याच्या तत्परतेने सुदैवाने दुर्घटना टळली.ट्रक थांबल्यानंतर टोल नाक्याच्या अग्निशमन दलाने तात्काळ आग आटोक्यात आणली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. तसेच महामार्गावरील वाहतूकही सुरळीत सुरू आहे.
टायर फुटल्याने बिंग फुटले सिन्नर : प्रतिनिधी समृद्धी महामार्गावरून वैजापूर येथून मुंबईकडे निघालेल्या एका कारचे…
आता जनावरांची वाहतूक होणार सुरक्षित सिडको विशेष प्रतिनिधी -भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान (DST) आणि…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मोहदरी - चिंचोली परिसरातील वन विभागाच्या डोंगराला अज्ञात कारणास्तव लागलेल्या आगीत…
आपल्या लाडक्या लहान बहिणीच्या लग्नासाठी मेहनत करुन जतन करून ठेवलेली सुमारे पावणे दोन लाख रुपयांची…
नाशिक : प्रतिनिधी आदिवासी विकास विभागाकडून आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना सामाजिक-भावनिक शिक्षण देण्यासाठी स्लॅम आउट लाउड आणि…
जिल्हा परिषदेच्या आरोग्याधिकार्यांना निवेदन नाशिक : प्रतिनिधी शासनाने ग्रामीण भागात काम करणार्या आरोग्य कर्मचार्यांना बायोमेट्रिक…