सातपूर स्वारबाबानगरमध्ये भंगार दुकानासह घराला आग
सातपूर: प्रतिनिधी
सातपूर स्वारबाबानगर परिसरात आज दुपारच्या सुमारास लागलेल्या आगीत भंगार दुकानासह घरातील साहित्य जळून खाक झाले.
या आगीत घरासह दुकान जळून खाक
यात संबंधिताचे जवळपास दोन लाखांचे नुकसान झाले आहे. आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक भंगार दुकानास आग लागली. आग पहाताच जवळ असलेल्या नागरिकांनी घर व दुकान मालक वाहब शेख यांच्याकडे धाव घेत घरातील मुलाबाळांना बाहेर काढले. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले.
घटनास्थळी अग्नीशामक दोन बंब दाखल झाले होते, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.