उत्तर महाराष्ट्र

तत्पर बसचालकामुळे वाचले प्रवासी

तत्पर बस चालकामुळे वाचले प्रवासी

लासलगांव प्रतिनिधी

लासलगाव आगारावरून सुटलेली लासलगाव – नाशिक सकाळी आठ वाजेची बस मंगळवारी हॉटेल मिरची औरंगाबाद रोड या ठिकाणाहून जात असताना अचानक बसचे ब्रेक फेल झाल्याने बस चालकाने दाखवलेल्या प्रसंगाधानाने जवळपास ७५ ते ८० प्रवाशी सुरक्षित बचावले.याच ब्लॅक स्पॉट वर मागील आठवड्यात झालेल्या अपघातात ११ प्रवाश्यांचा बळी गेला होता.ही घटना ताजी असतांना लासलगाव आगराच्या चालका ने दाखविलेल्या समयसूचकतेने दुर्घटना टळली

लासलगाव आगाराची नियमित धावणारी लासलगाव- नाशिक बस ही साडे नऊ वाजेच्या सुमारास जात असताना अचानक हॉटेल मिरची च्या जवळ बस चे ब्रेक फेल झाल्याने चालक पी व्ही भाबड यांनी प्रसंगावधान दाखवत बस नियंत्रित करत बस मधील जवळपास ७५ प्रवाश्यांना सुरक्षित पणे आडगाव नाका पर्यंत पोहचवले.यावेळी वाहक डी यु राठोड यांनीं सर्व प्रवाश्यांना दुसऱ्या बस मध्ये बसवत रवाना केले.चालक आणि वाहक या दोघांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळल्याने प्रवाश्यांकडून या दोघांचे आभार व्यक्त करण्यात आले.

लासलगांव आगारातील बसेसचा दर्जा हा अंत्यंत खालावलेला असून अनेक नादुरुस्त बस या रस्त्यावर चालत आहे.कोरोना पूर्वी लासलगाव बस आगारात ५६ बसेस या प्रवाश्यांच्या सेवेसाठी होत्या.मात्र आत्ता फक्त ३४ बसेस लासलगाव सेवेत आहेत.बस आगारकडून मागणी करूनही नवीन बसेस येत नसल्याने पालकमंत्री दादा भुसे यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज

गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…

2 days ago

जुने नाशिक भागात आमदार फरांदे यांनी साधला सवांद

नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी  आल्याने…

2 days ago

नांदगावमध्ये सुहास कांदे आणि समीर भुजबळांमध्ये राडा

नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…

2 days ago

यांनी बजावला मतदानाचा हक्क

नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…

2 days ago

जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान

  जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…

2 days ago

बनकर, कदम यांनी बजावला मतदानाचा हक्क

निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…

2 days ago