नाशिकमध्ये घर घेणे आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर
रेडीरेकनर दरात ७.३१ टक्के वाढ
नाशिक : प्रतिनिधी
राज्य सरकारने काल (दि.३१) नवीन आर्थिक वर्षाच्या पूर्वसंध्येला रेडी रेकनर दर जाहिर केले.कोरोना संकटानंतर मागील दोन वर्षांपासून रेडीरेकनरच्या दरात शासनाने वाढ केली नव्हती. त्यामुळे यंदा आर्थिक वर्षासाठी शासन रेडीरेकनर दरात वाढ करेल ही शक्यता खरी ठरली आहे. नाशिक शहरात ७.३१ टक्के इतकी दर वाढ केल्याने नाशिकमध्ये घरांच्या किंमती वाढणार असल्याने सर्वसामान्यांना याचा फटका बसणार आहे.
राज्य सरकारने तब्बल दोन वर्षानंतर २०२५ – २६ या आर्थिक वर्षासाठी रेडिरेकनर दरात मोठी वाढ केली असून नाशिक शहरासाठी ही वाढ ७.३१ टक्के इतकी आहे. १ एप्रिलपासून ही दरवाढ लागू राहणार आहे. दरम्यान आधीच घराच्या किंमती सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर असताना दरवाढीमुळे घर खरेदीचे स्वप्नाला ब्रेक लागू शकतो. दरम्यान राज्यात सर्वाधिक दरवाढ (मुंबई वगळून) ही सोलापूर शहराची असून ती १०.१७ टक्के इतकी आहे.
ऐकावे ते नवलच: बंगला बळकावण्यासाठी बिल्डरनेच दिली दरोड्याची सुपारी
रेडीरेकनर दरात वाढ केल्याने त्याचा थेट परिणाम बांधकाम व्यवसायावर होणार आहे. त्याचा थेट परिणाम सदनिकांच्या किमतीत वाढ होईल. त्यामुळे शहरातील सदनिकांच्या किमंतीत मोठी वाढ होणार आहे. सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न आणखी महाग होणार असून ग्राहकांच्या खिशाला झळ सोसावी लागेल. जीएसटी, विक्री कर, यानंतर तिसर्या क्रमांकाचे सर्वाधिक उत्पन्न नोंदणी आणि मुद्रांक शुल्कातून मिळते.राज्याच्या वेगवेगळ्या भागांतील गेल्या दोन वर्षांत झालेल्या खरेदी-विक्रीची रक्कम विचारात घेत वेगवेगळ्या भागांत वाढीचे वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले आहे.
दरम्यान रेडी रेकनरच्या दरात वाढ होणार असल्याने याचा परिणाम थेट खरेदी-विक्री व्यवहारावर होणार असून यात तब्बल साडे सात टक्के वाढ झाल्याने रियल इस्टेट मध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असणाऱ्यांना अधिकचा कर, स्टॅम्प डयुटी, रजिस्ट्रेशन शुल्क या सह एजंटची फी या सर्व प्रक्रियेतून जावे लागणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना याचा फटका तर बसणार आहे.
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…
अॅपचा वापर करण्याचे पंतप्रधानांकडून आवाहन नाशिक : प्रतिनिधी नागरिकांना नैसर्गिक आपत्तीसह ऊन व पावसाची माहिती…
पिंपळगावच्या व्यापार्याविरोधात गुन्हा दाखल चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडनेरभैरव येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्याची तब्बल 15…