नाशिक: प्रतिनिधी


सातपुरच्या शिवाजी नगर भागातील निगळ पार्क भागात घरासमोर पार्क केलेल्या चार चाकी वाहनांच्या काचा फोडून नासधूस करणाऱ्या समाज कंटक यांच्या मुसक्या आवळण्यात गंगापूर पोलिसांना यश आले आहे शिवाजी नगर भागात मंगळवारी रात्री1 च्या सुमारास घरावर दगडफेक करण्याबरोबरच घरासमोर पार्क केलेल्या ट्रक, कार यांच्या काचा फोडल्या, तसेच हातात कोयते घेऊन दहशत निर्माण केली, यावेळी तिघा टवाळखोरांनी जोर जोरात आरडा ओरड करत परिसराची शांतता भंग केली. आरडाओरड करताना टवाळ खोर पोलिसांना बोलवा, आमचे काहीच वाकडे होणार नाही, असे जोर जोरात ओरडत होते, नागरिकांनी पोलिसांना कॉल केल्यानंतर टवाळखोरांनी परिसरातील असलेल्या एका इमारतीच्या पाण्याच्या टाकीजवळ लपून बसले. 112 ला कॉल केल्यानंतर एकाच वेळी गंगापूर पोलीस ठाण्याची डी बी मोबाईल, सी आर मोबाईल, पीटर मोबाईल या तीन पोलीस गाड्या दाखल झाल्या. पोलिसांनी बिल्डिंग च्या गच्चीवर जात तिघा तवळखोरांच्या मुसक्या आवळत त्यांना यथेच्छ चोप दिला. पोलिसांनी या तिघा टवाळखोरांवर गुन्हा दाखल केला आहे.
112 ला कॉल अन पोलिसांची तत्परता
गाड्यांची तोडफोड केल्यानंतर टवाळखोर परिसरातील एक इमारतीत लपून बसले होते. एका सुजाण नागरिकाने 112 ला कॉल केल्यानंतर गंगापूर पोलिसांची डी बी मोबाईल, सी आर मोबाईल, पीटर व्हॅन तातडीने दाखल झाले. इमारतीचा कोपरा न कोपरा शोधत पाण्याच्या टाकीजवळ लपलेले तिघे ताब्यात घेतले त्यांच्याकडून कोयते ताब्यात घेत त्यांना यथेच्छ चोप दिला. गाड्यांची तोडफोड केल्यानंतर अवघ्या एक तासात या समाजकंटकांच्या मुसक्या आवळल्या. त्यामुळे पोलिसांच्या या तत्परतेचे नागरिकांनी कौतुक केले. या समाजकंठकाकडून वाहनांच्या नुकसानीची भरपाई घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.