साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नाशिक:
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित जिल्हा  कार्यालयामार्फत मातंग समाज व त्यातील 12 पोट जातीतील 60 टक्के व त्यापेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. याअनुषंगाने पात्र विद्यार्थी व विद्यार्थिनींनी 22 जुलै 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक संजय आरणे यांनी केले आहे. या संदर्भात जारी करण्यात आलेल्या शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, या योजनेंतर्गत 2021-22 वर्षामध्ये इयत्ता 10 वी व 12 वी, पदवी व वैद्यकीय, अभियांत्रिकी अभ्यासक्रमात 60 टक्के व त्यापेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना गुणवत्तेनुसार (मेरीटप्रमाणे) व उपलब्ध निधीनुसार शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नासर्डी पुलाजवळ, नाशिक-पुणे रोड, नाशिक येथिल जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे जिल्हा व्यवस्थापक संजय आरणे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *