खासदार संजय राऊत यांच्यावर नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नांदगाव आमिन शेख
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या बद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल नांदगाव पोलीस ठाण्यात भाजपचे नांदगाव मंडलअध्यक्ष संजय सानप यांनी खासदार संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार केली आहे आमच्या नेत्यांची सार्वजनिक प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न खासदार संजय राऊत यांनी केला असुन याबाबत आम्ही हा गुन्हा दाखल केला असल्याचे मत सानप यांनी व्यक्त केले.
शिवसेना नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना सांड म्हणुन संबोधले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही तुला पदावरून काढुन टाकू अशी धमकी दिली याविरोधात नांदगाव तालुका भाजपा आक्रमक झाली असुन भाजपच्या वतीने मंडल अध्यक्ष संजय सानप यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात समक्ष हजर होऊन खासदार संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असुन बदनामी करणे व धमकी देणे आशा स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे यापूर्वीही तत्कालीन कृषीमंत्री दादा भुसे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल भुसे यांनी राऊत यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला असुन या खटल्या संदर्भात राऊत हे मालेगाव कोर्टात सुनावणी साठी हजर राहतात
राजकीय नेत्यांनी तारतम्य ठेवून बोलावे.
राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये मतभेद असतात वैचारिक असो किंवा इतर असो मतभेद असणे ही चांगली गोष्ट आहे खासदार संजय राऊत असो किंवा इतर कोणत्याही पक्षाचे नेते त्यांनी आमच्या भाजपच्याच नाही तर इतर कोणत्याही पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात बोलताना भान ठेवून बोललं पाहिजे समोरच्या व्यक्तीची इज्जत जाईल किंवा त्यांना खाली बघावे लागेल असे वक्तव्य करू नये शा नेत्यांना आवरावे अन्यथा भाजपा देखील जशास तसे उत्तर देण्यासाठी तत्पर असेल
संजय सानप ,नांदगाव मंडळ अध्यक्ष भाजप