नाशिक

बनावट जन्म दाखल्याप्रकरणी सातपूरला गुन्हा दाखल

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहरात तब्बल अठरा हजार जन्म दाखल्यांच्या नोंदी संशयास्पद असल्याचा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. सातपूर येथील मनपा कार्यालयामार्फत एका महिलेला हा बोगस दाखला दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.
याबाबत महापौर हिमगौरी आडके यांनी सविस्तर अहवाल देण्याचे आदेश दिले होते. आता याप्रकरणी सातपूर पोलिसांत संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख नायजा नूर मोहम्मद असे या महिलेचे नाव आहे. तिच्याविरोधात महापालिका सातपूर कार्यालयातील सहायक अधीक्षक जितेंद्र पर्डे यांनी फिर्याद दिली.
दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी आरोग्य अधिकारी तथा निबंधक जन्म-मृत्यू महापालिका नाशिक यांच्याकडील जावक क्रमांक आरोग्य अवैध नोंदी 13/ /2026 अन्वये सोबत जोडलेल्या छायांकित जन्म प्रमाणपत्र प्रतमधील अर्जदार शेख नाईजा नूर महम्मद हिचे कार्यालयात ऑनलाइन प्रणालीत सदर प्रमाणपत्रावरील नोंदणी क्रमांक 2024.9.90347.007830 हे तपासले असता सदरचे प्रमाणपत्र खोटे असून, जन्म-मृत्यू सातपूर रेकॉर्ड विभागात माहिती आढळून येत नाही. हे प्रमाणपत्र दिल्याची वेळ, दिनांक व निर्गमित करणारे प्राधिकारी हे या कालावधीत या कार्यालयामध्ये कर्तव्यावर नसल्याचे निष्पन्न झाले आहे. यावरून शेख नायजा नूर महम्मद (रा. नाशिक) यांनी शासनाची दिशाभूल करून बनावट व खोटे प्रमाणपत्र सादर केले असल्याचे सिद्ध होते. याबाबत सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी चार दिवसांपूर्वी महापालिकेत पत्रकार परिषद घेत नाशिक शहरामध्ये अशा बनावट आणि खोट्या नोंदी करणार्‍यांची संख्या तब्बल अठरा हजार आहे. त्यामुळे या बनावट दाखल्यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्याअंतर्गत पहिला गुन्हा दाखल झाला आहे.

Case registered in Satpur for fake birth certificate

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

11 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

11 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

11 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

11 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

11 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

12 hours ago