नाशिक

शहरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची वाहनधारकांवर नजर

40 सिग्नलवर सीसीटीव्ही प्रणाली कार्यान्वित

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांची संख्या लक्षात घेता नाशिक शहर पोलीस यांनी वाहतूक शिस्तीबाबत कडक पावले उचलली आहेत. शहरातील प्रमुख चौक आणि सिग्नल येथे अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे व अ‍ॅडव्हान्स ट्रॅफिक कंट्रोल सिस्टिम कार्यान्वित करण्यात आली असून, नियमभंग करणार्‍या वाहनधारकांवर ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई सुरू आहे.
शुक्रवारी (दि. 20) विविध भागांत सिग्नल तोडणे, ट्रिपल सीट प्रवास, हेल्मेट व सीटबेल्ट न वापरणे, वेगमर्यादा ओलांडणे तसेच मोबाइलवर बोलत वाहन चालवणे अशा प्रकारांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. संबंधित वाहनधारकांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर तत्काळ ई-चलनाचा एसएमएस पाठविण्यात आला.
40 ठिकाणी सिग्नल कार्यान्वित
सरकारवाडा, गंगापूर, पंचवटी, मुंबईनाका, सातपूर, अंबड, नाशिक रोड आदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण 40 सिग्नलवर सीसीटीव्ही प्रणाली बसविण्यात आली आहे. सी.बी.एस., मेहेर सिग्नल, कॅनडा कॉर्नर, सिव्हिल हॉस्पिटल, सिटी सेंटर मॉल, गडकरी चौक, मुंबई नाका सर्कल, पेठ नाका, मखमलाबाद नाका, आयटीआय चौक, महिंद्रा सर्कल, बिटको चौक, सिन्नर फाटा, दत्त मंदिर आदी प्रमुख चौकांचा समावेश आहे. प्रमुख चौकांत बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि ऑटोमॅटिक नंबरप्लेट रेकग्निशन प्रणाली वाहन क्रमांक ओळखून नियमभंगाची नोंद करतात. वाहतूक पोलिसांकडे हँडहेल्ड मशीनद्वारे ही तत्काळ डिजिटल पावतीसह दंड आकारला जातो. वाहनधारकांना ऑनलाइन डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा अधिकृत पोर्टलवरून दंड भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. वेळेत दंड न भरल्यास प्रकरण न्यायालयात जाऊ शकते. तसेच वाहन विक्री, आरटीओ व्यवहारांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करून वेळेत दंड भरणे आवश्यक आहे.

ई-चलन प्रणालीमुळे कारवाईत पारदर्शकता येत असून, भ्रष्टाचाराला आळा बसत आहे. मात्र, सुरक्षित आणि अपघातमुक्त नाशिकसाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे असल्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. नाशिक शहर सुरक्षित व भयमुक्त करण्याचा आमचा मानस असून, नागरिकांच्या सहकार्यानेच हा उपक्रम यशस्वी होईल. शाळा-महाविद्यालय परिसर, बाजारपेठा, बसस्थानके, रेल्वेस्थानक परिसर तसेच गर्दीची ठिकाणे यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
– किरिथिका सी. एम. पोलीस उपायुक्त, मुख्यालय/ वाहतूक

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

विंचूरसह परिसरातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक

अवैध व्यवसायांसह खून, लहान-मोठ्या चोर्‍यांची मालिका सुरूच विंचूर : संदीप शिरसाठ विंचूर ऐतिहासिक परंपरा लाभलेले…

5 hours ago

गोंदेश्वर मंदिराच्या दानकर्त्याचे शिल्प प्रकाशझोतात

प्रा. जावेद शेख यांचा संशोधनातून महत्त्वपूर्ण शोध सिन्नर : वार्ताहर ऐतिहासिक व स्थापत्यवैभवासाठी ओळखल्या जाणार्‍या…

5 hours ago

दारू दुकान हटविण्यासाठी महिलांचा रास्ता रोको

अपघाती मृत्यूनंतर चांदवडमध्ये जनक्षोभ चांदवड : वार्ताहर येथील गणूर रोडवरील फुलेनगर भागात मंगळवारी (दि. 24)…

5 hours ago

मनमाडमध्ये स्वच्छतेचा केवळ देखावा; राष्ट्रवादीची टीका

मनमाड : अमिन शेख मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून सध्या शहरात राबविली जाणारी स्वच्छता…

5 hours ago

मनपा हद्दीत 16 ग्रामपंचायतींच्या कचर्‍याचा बोजा?

व्यवस्था कोलमडणार; महासभेवर लवकरच प्रस्ताव? नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेला आपल्याच कचर्‍याचे वर्गीकरण करण्यात अपयश…

6 hours ago

लक्ष्मी वेंकटेश मंदिर सायखेडा येथे ब्रह्मोत्सवात रंग-भक्तीचा संगम

पालखी सोहळ्याने सायखेडा भक्तिमय नाशिक : प्रतिनिधी सायखेडा येथे बालाजी भगवान संस्था यांच्या प्राचीन परंपरेनुसार…

6 hours ago