नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण
सिडको : विशेष प्रतिनिधी
सिडकोतील महाकाली चौक येथील उद्यानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यांची अज्ञात तरुणांच्या टोळक्याने नुकतीच तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, परिसरात चिंता आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
रात्रीच्या वेळेस उद्यानात टवाळखोर, मद्यधुंद तरुणांचा वावर वाढला आहे. त्यामुळे नियमित व्यायामासाठी येणार्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. महिलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेक जण आता उद्यानात येण्यास टाळाटाळ करत आहेत.गेल्या महिन्यांपूर्वीही अशाच प्रकारे या उद्यानातील कॅमेर्यांची तोडफोड करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी सहा ते सात आरोपींविरुद्ध कारवाई केली होती. मात्र, पुन्हा एकदा अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे कडक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. उद्यानात सुरक्षारक्षकांची नेमणूक, सीसीटीव्हींचे दुरुस्ती व देखरेख व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त केली आहे.
दरम्यान, पोलिसांनी या घटनेची दखल घेत तपास सुरू केला आहे. लवकरच दोषींना ओळखून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
मनमाड: प्रतिनिधी मागील काही दिवसांपूर्वी मनमाड शहरातील सिकंदर नगर भागातील पाच वर्षीय मुलाचे अपहरण करण्याचा…
राज्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हनी ट्रॅप केंद्रबिंदू या शहरात शहापूर/ साजिद शेख गेल्याकाही दिवसांपासून विधीमंडळात एक-…
जव्हार( राजेवाडी )येथे गॅस्ट्रो साथीचे थैमान: दोन रुग्णांचा मृत्यू, 14 रुग्णांवर उपचार सुरू मोखाडा: …
आधी प्रेम... मग लिव्ह इन अन नंतर ... शहापूर/साजिद शेख २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला अश्लील…
दिंडोरी येथील अपघातात सात ठार अपघातात तीन महिला, तीन पुरुष एक बालकाचा समावेश दिंडोरी…
साखरपुडा एकाशी, लग्न त्याच्याच मित्राशी प्रेमात धोका, स्टेटस ठेवले अन् पुढे घडले... सद्या प्रेमाची व्याख्याच…